नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (Life Insurance Corporation of India) लोकांना त्यांच्या कंपनीचा लोगोबाबत (Logo) सतर्क केलं आहे. जर तुम्ही कंपनीच्या नोंदणीकृत ब्रॅण्डचं नाव किंवा लोगो विनापरवानगी वापरच आहात तर हा दंडनीय गुन्हा आहे. असं केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. LIC ने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. काही संशयित लोक LIC च्या लोगोचा वापर सोशल मीडिया आणि डिजीटल मीडियावर विनापरवानगी करत आहेत. हा दंडनीय गुन्हा आहे, असं एलआयसी म्हणाली (LIC Warns Strict Actions Will Be Taken For Using LOGO Without Permission).
“कॉपीराईट अॅक्ट 1957 अंतर्गत LIC लोगोचे आम्ही अधिकृत मालक आहोत. त्यासोबतच आम्ही इतर प्लान, ब्रॉशर्स, जाहिराती आणि आमच्याद्वारे छापण्यात आलेल इतर गोष्टींचं मूळ साहित्यिक आणि कलात्मक कार्यांचं कॉपीराईटचे मालक आहोत. त्याशिवाय, डोमेन नेम www.licindia.in यावरही आमचा अधिकार आहे”, असं ट्वीट LIC ने केलं.
Caution Notice. pic.twitter.com/0OtJqQ06CE
— LIC India Forever (@LICIndiaForever) December 16, 2020
“काही लोक विनापरवानगी LIC लोगोचा वापर विमा आणि विमा अॅडव्हायझरी सर्व्हिसेससारख्या कामांसाठी करत आहेत. यामुळे लोकांमध्ये आणि पॉलिसीधारकांमध्ये एलआयसीबाबत साशंकता निर्माण होत आहे. एकसारखं ट्रेड मार्क/सर्व्हिस मार्क किंवा डोमेनचं नाव वापरणाऱ्या लोकांबाबत कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा LIC ने दिला आहे (LIC Warns Strict Actions Will Be Taken For Using LOGO Without Permission).
अशा गोष्टींवर आळा घालण्यासाठी दोषींवर सिव्हील आणि क्रिमिनल अशा दोन्ही कारवाया केल्या जातील. आमच्या प्रोडक्टबाबत सर्व माहिती कंपनीच्या www.licindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याशिवाय, आमच्या अधिकारीक वेबसाईटशिवाय डिजीटल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीसाठी आम्ही जबाबदार नाही, असंही LIC ने स्पष्ट केलं.
PF Account मध्ये अशी अपडेट करा बँकेची माहिती; फक्त तीन टप्पे आणि काम फत्ते#PFAccount #bankdetailhttps://t.co/nEg99pMidH
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
LIC Warns Strict Actions Will Be Taken For Using LOGO Without Permission
संबंधित बातम्या :
LIC | एलआयसीची ग्राहकांसाठी नवी सुविधा, ‘हे’ फायदे होणार
…तर बँक खाते रिकामं झालेच म्हणून समजा; SBI चा पुन्हा एकदा ग्राहकांना अलर्ट
बँक खातेदारांना सरकारचं गिफ्ट; आता ‘या’ सुविधा घरबसल्या मिळणार
आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम