जर तुम्ही मद्यप्रेमी असला तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जगातील बेस्ट व्हिस्की इंद्री तयार करणारी कंपनी पिकॅडिली ॲग्रोच्या शेअरमध्ये तुफान तेजीचे सत्र आहे. पिकॅडिली ॲग्रोचा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअरमध्ये शुक्रवारी 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. मुंबई स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 800.95 रुपयांवर पोहचला. त्यामुळे मद्यप्रेमीसोबतच गुंतवणूकदार मालामाल झाले. ही कंपनी लवकरच दोन नवीन व्हिस्की ब्रँड्स बाजारात आणणार आहे.
कँटिनमध्ये मिळतील दोन ब्रँड्स
कंपनीच्या 2 मेन व्हिस्की ब्रँड्सला सेंट्रल ऑर्म्ड पुलिस फोर्सेज कँटिनमध्ये पुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. पिकॅडिली ॲग्रोच्या शेअरमध्ये गेल्या 5 वर्षांत 10000 टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी आली आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 910.70 रुपये आहे. तर पिकॅडिली ॲग्रोचा शेअरचा 52 आठवड्याती निच्चांक 95 रुपये आहे. एकाच वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना
593.10 टक्क्यांपेक्षा अधिकची कमाई करुन दिली आहे.
1 लाखाचे झाले 8 लाख
दारु तयार करणाऱ्या पिकॅडिली ॲग्रोमध्ये ज्यांनी 95 रुपये प्रति शेअर या भावाने एक लाख रुपयांचे शेअर खरेदी केले. त्यांना 593 टक्क्यांचा फायदा झाला. त्यांचे एक लाख रुपये आता 8,42, 400 रुपये इतके झाले आहेत. एक वर्षापूर्वी कंपनीचा शेअर 95 रुपये होता. तर आता हा शेअर 800 रुपयांवर पोहचला आहे. याशिवाय कंपनीत सहा महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना दुप्पट फायदा झाला आहे. गेल्या सहा महिन्यात पिकॅडिली ॲग्रोचा शेअरमध्ये 115 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला आहे.
5 वर्षांत 10000% अधिकची उसळी
पिकॅडिली ॲग्रोचा शेअर गेल्या 5 वर्षांत 10400 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. या कंपनीचा शेअर 30 ऑगस्ट 2019 रोजी 7.34 रुपयांवर होता. तर हा शेअर या 29 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर 788.45 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 8300 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.