मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. याशिवाय ऑनलाईन वेबसाईट्सकडून अनेक आकर्षक फेस्टिव्ह ऑफर सुरु करुन मोठी सूट दिल्याच्या जाहिरातीही पाहायला मिळतात. मात्र, याच सूटीच्या नावाखाली अनेकदा सर्वसामान्य ग्राहकांची मोठी फसवणूक झाल्याच्याही घटना घडतात. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अशाच फसवणुकींचं एक मोठं रॅकेटच उघड केलंय. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाच्या तपासत केवळ संबंधित वेबसाईटच नाही, तर इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट फसवणूक करत असल्याचं समोर आलंय (List of Fake bogus fraud online shopping website racket by Mumbai Police).
मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने ऑनलाईन शॉपिंगच्या निमित्ताने वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देणाऱ्या अशा काही फसव्या वेबसाईट्सची एक यादीच तयार केलीय. तसेच ही यादी जाहीर करुन नागरिकांना या वेबसाईट्सपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. चुकूनही या वेबसाईट्सवर खरेदी केली तर नागरिकांना आपल्या कष्टाचा पैसा गमवावा लागेल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलिसांनी ट्विटरवर या फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्ची यादी जाहीर केलीय.
मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “फसव्या वेबसाईट्सच्या काळ्या जगात पडू नका. मुंबई पोलिसांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका आयटी तज्ज्ञाला गुजरातमधून अटक केलीय. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सुरु असलेलं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आलंय. आरोपीने घरगुती साहित्य अगदी कमी किमतीत मोठी सूट देत विकण्याचं आमिष दाखवत तब्बल 22,000 लोकांना फसवलं होतं. या रॅकेटमध्ये आरोपीने 70 लाख रुपयांना गंडा घातला होता.
ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स
Don’t Fall In The Dark Web Of Fake Sites!
Mumbai Cyber Police arrested an IT expert from Gujarat, busting a fake online shopping racket.
Using fake websites selling household items, accused duped 22,000+ people for more than ₹70 lakh.#MumbaiCaseFiles #CyberSafety pic.twitter.com/ehTuZ8EJf2
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 19, 2021
परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक
मुंबई पोलिसांनी नुकतीच देशभरात शॉपिंग साईटवरून 22 हजार महिलांची फसवणूक करणाऱ्याला ठगाला अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली. विशेष म्हणजे 32 वर्षीय आरोपी संगणकतज्ज्ञ असून त्याने परदेशात शिक्षण घेतलंय. त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग पैसे मिळवण्याच्या शॉर्टकटसाठी वापरला आणि आता सध्या तुरुंगाची हवा खात आहे.
आरोपीने महिलांची फसवणूक करण्यासाठी महिलांसाठी असणाऱ्या अनेक शॉपिंग वेबसाईट्सचा उपयोग केला. या माध्यमातून त्याने विविध महिलांची 70 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. त्यामुळेच शॉपिंग संदर्भातील 11 वेबसाईट्स मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या रडारवर आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास करुन आणखी महिलांची फसवणूक होणार नाही यासाठी कारवाई होणार आहे. या प्रकरणात सायबर सेल अधिक तपास आहे.
हेही वाचा :
परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल
ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले, आता ग्राहक झाले पॉवरफुल्ल
व्हिडीओ पाहा :