नवी दिल्ली : महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सातत्याने रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करत आहे. सप्टेंबर महिन्यात आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पाईंटची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर वाढून 5.9 टक्के झाला. यानंतर आता 3 नोव्हेंबर रोजी पुन्हा रेपो दरात वाढीचा शक्यता आहे. दरम्यान काही बँकांनी व्याजदर वाढविले आहेत. सेवा (Service) योग्य मिळत नसल्याने काही ग्राहक बँकेवर नाराज होतात. त्यामुळे त्यांना कर्ज हस्तांतरीत करण्याचा पर्याय वापरता येतो.
बँकांनी व्याजदर वाढविल्याने ईएमआय वाढला आहे. जर इतर बँकांचा ईएमआय या तुलनेत कमी असेल तर ग्राहकांना कर्ज हस्तांतरीत करता येते. ही प्रक्रिया फार सोपी आहे. कर्ज कसे हस्तांतरीत करण्यात येते, ते पाहुयात..
कर्ज हस्तांतरीत (Loan Transfer) करण्यापूर्वी त्या बँकेचे व्याजदर तपासून पहा. तसेच कर्ज हस्तांतरीत करताना ही बँक काय शुल्क आकारते. तसेच छुपे चार्जेस लावते का याची चौकशी करा. त्यानंतर कर्ज हस्तांतरीत करण्याचा निर्णय घ्या.
कर्ज हस्तांतरीत करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या बँकेपेक्षा कमी व्याज आकारणाऱ्या बँकेची माहिती घ्यावी लागेल. नवीन बँक जर कमी EMI आकारत असेल तर त्यामुळे तुमची बचत होईल. त्यादृष्टीने कर्ज हस्तांतरीत करणे फायदेशीर ठरेल.
लोन ट्रांसफर करण्यासाठी जुन्या बँकेकडून फोरक्लोजरचा अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर जुन्या बँकेकडून खात्याचा तपशील आणि मालमत्तेची कागदपत्रे घ्यावी लागतील. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला ज्या बँकेत कर्ज हस्तांतरीत करायची आहे, तिथे जमा करावी लागतील.
नवीन बँकेत कर्ज हस्तांतरीत करण्यासाठी जुन्या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावावे लागेल. त्यासाठी कन्सेंट लेटर पण मिळविता येईल. हे लेटर नव्या बँकेत जमा करावे लागेल.
नवीन बँकेत लोन ट्रांसफर करण्यासाठी सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यासाठी नवीन बँकेला ग्राहकाला 1 टक्के प्रक्रिया शुल्क द्यावे लागेल.
कर्ज हस्तांतरीत करताना नवीन बँकेत, केवायसी कागदपत्रे, मालमत्ता पेपर, लोन बँलन्स, व्याजाची कागदपत्रे, अर्ज, सहमती पत्रासहीत इतर आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवीन बँक जुन्या बँकेकडून सहमती पत्र घेते. त्यानंतर सध्याच्या बँकेतील कर्ज बंद होईल. त्यानंतर नवीन बँकेसोबत करार करावा लागतो. बँकेचे शुल्क अदा करावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर नवीन बँकेत ईएमआय सुरु होतो.