नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान फाळणी (India-Pakistan Partitions) अनेकांसाठी कटू आठवणी आहेत. अनेकांना बरेच काही भोगले. तर अनेकांनी बरेच काही गमावले. दोन्ही देशातील जनता बेघर झाली. पाकिस्तानमधून अनेकांना कट्टरवाद्यांमुळे पलायन करावे लागले. हक्काचं घर, जमीन-जुमला तसाच मागे ठेवत जीव मुठीत घेऊन भारतात यावे लागले. पण या अनुभवातून तावून सलाखून निघत, काहींनी मोठी झेप घेतली. ते सोन्यासारखे चकाकले. त्यांनी स्वतःचे नशीब स्वतःचे लिहिले. अनेक उद्योजकांनी नशीब काढले. भारताचे यशस्वी उद्योजक विनोद अग्रवाल (Industrialist Vinod Agarwal) यांचा संघर्ष असाच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ही संघर्षाची कहाणी अनेकांच्या मनाला उभारी देणारी आहे.
भारतीय श्रीमंतांच्या यादीत समावेश
विनोद अग्रवाल हे सध्या इंदुर शहरात राहतात. ते आयआयएफएल हुरुन या श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे 1,000 कोटींहून अधिकची संपत्ती आहे. विनोद अग्रवाल श्रीमंतांच्या यादीत 279 व्या क्रमांकावर आहेत. गेल्यावर्षी ते या यादीत 494 क्रमांकावर होते.
चढता आलेख
डीएनएमधील अहवालानुसार, अग्रवाल कोल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ते मालक आहेत. विनोद अग्रवाल यांची एकूण संपत्ती 6,000 कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी त्यांची नेटवर्थ 4,000 कोटी रुपये होती. पण एकाच वर्षांत त्यांच्या नेटवर्थने मोठी झेप घेतली. त्यांच्या संपत्तीत 2,000 कोटी रुपयांची वाढ झाली. विनोद अग्रवाल यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 11,000 कोटी रुपये आहे.
इतका भरला कर
विनोद अग्रवाल हे देशाच्या विकासाला पण मोठा हातभार लावत आहे. ते सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा करतात. दरवर्षी कर रुपाने ते मोठ्या रक्कमेचा भरणा करतात. 2022 मध्ये विनोद अग्रवाल यांनी 243 कोटी रुपयांचा प्राप्तिकर भरला. तर 625 कोटी रुपयांचा जीएसटी भरला होता.
दान करण्यात अग्रेसर
विनोद अग्रवाल हे दानशूर आहेत. देशाच्या विकासातच नाही तर अनेक सामाजिक कार्यासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. त्यांनी कोट्यवधी रुपये अनेक सामाजिक कार्यासाठी दिले. विनोद अग्रवाल फाऊंडेशनने 2022 मध्ये 25 कोटी रुपयांचं दान केले होते. ते सर्वात मोठे करदाते आहेतच पण त्यांनी मोठी संपत्ती दान केली आहे.
फाळणीनंतर इंदूरमध्ये
विनोद अग्रवाल यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी हालकीचे जीवन काढले. पाकिस्तानमध्ये त्यांच्या वाडवडिलांची मोठी संपत्ती होती. पण फाळणीनंतर सर्वकाही गमावून अवघ्या तिसऱ्या वर्षी ते भारतात दाखल झाले. काही आप्तेष्टांसह त्यांनी इंदूर शहर गाठले. छोटी-मोठी कामं करत त्यांनी यशाला गवसणी घातली.