नवी दिल्ली | 7 March 2024 : केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वीच लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत पेन्शनधारकांना पण लॉटरी लागू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी Cabinet (CCEA) च्या बैठकीत महागाई भत्ता (DA) 4% वाढविण्याचा निर्णय घेतल्या जाऊ शकते. 1 जनवरी 2024 रोजी पासून हा वाढीव भत्ता लागू होईल. कर्मचाऱ्यांना या तीन महिन्यांचा वाढीव भत्ता पगारातच जोडून येण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे महागाई भत्ता आणि महागाईपासून दिलासा 50 टक्क्यांपेक्षा अधिक होतील.
असा निश्चित होतो भत्ता
केंद्र सरकार औद्योगिक कामगारांसाठी महागाई भत्ता सीपीआयच्या आकडेवारीवरुन निश्चित करते. सध्याच्या स्थितीत सीपीआय डेटा 12 महिन्यांच्या सरासरी 392.83 वर आहे. त्याच्या आधारावर डीए मुळ वेतनाच्या 50.26 टक्के होईल. कामगार मंत्रालय दर महिन्याला सीपीआय-आयडब्ल्यू डाटा प्रकाशित करते.
DA आणि DR मध्ये काय अंतर
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांसाठी असतो तर महागाईपासून दिलासा हा निवृत्तीधारकांना लागू करण्यात येतो. DA आणि DR खासकरुन जानेवारी आणि जुलै महिन्यात दोनदा वाढविण्यात येतात. यामध्ये शेवटची वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये करण्यात आली होती. तेव्हा डीए 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्के करण्यात आला होता. महागाईच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. जर मार्च महिन्यात डीए वाढविण्याची घोषणा झाली तर तो या जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मागील थकबकी पण मिळेल.
कसा मिळेल फायदा