नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराने जोरदार कामगिरी बजावली आहे. नवनवीन रेकॉर्ड गाठले आहे. शेअर बाजाराचे मार्केट कॅपमध्ये पण मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा इक्विटीसह म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना झाला आहे. गेल्या एका वर्षात अनेक म्युच्युअल फंड हाऊसने नवीन योजना बाजारात उतरवल्या आहेत. अशात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढली आहे. या म्युच्युअल फंडच्या एका स्कीमने तर एका वर्षात गुंतवणूकदारांना तगडी कमाई करुन दिली आहे. या फंडने एका वर्षात 45 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.
एका वर्षात 45 टक्क्यांचा रिटर्न
ICICI प्रूडेंशिअल AMC च्या PIPE या धोरणा आधारीत म्युच्युअल फंड स्कीमने ही कमाल केली आहे. या स्कीमने गुंतवणूकदारांना एकाच वर्षात 45.66 टक्के, दोन वर्षांत 25.63 टक्के आणि तीन वर्षांत 43.45 टक्के परतावा दिला. ICICI प्रूडेंशिअल कान्ट्रा आणि फ्लेक्सीकॅप स्ट्रेटर्जीशी संबंधित गुंतवणूक योजनांचे व्यवस्थापन करते. कान्ट्रा स्ट्रेटर्जी योजनेने एका वर्षात गुंतवणूकदारांना 43.91 टक्के, दोन वर्षांत 18.77 टक्के तर तीन वर्षांत 33.39 टक्के परतावा दिला आहे.
गुंतवणूकदार झाले गब्बर
कान्ट्रासारखाच फ्लेक्सीकॅप स्ट्रेटर्जी योजनेने एका वर्षात 29.49 टक्के, दोन वर्षात 13.01 टक्के आणि तीन वर्षांत 25.80 टक्के परतावा दिला आहे. S&P BSE 500 ने क्रमशः 23.98 टक्के, 11.72 टक्के आणि 26.42 टक्के रिटर्न दिला. इतर काही योजनांनी पण मोठा वाटा उचलला. म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात वळाल्याचे ताज्या आकडेवारीवरुन दिसून येते.
एका वर्षात AUM मध्ये 90 टक्क्यांची वाढ
ICICI प्रूडेंशिअल AMCच्या पीएमएस गुंतवणूक योजनांमध्ये रिटर्न तगडा मिळत असल्याने योजना लोकप्रिय झाली आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीचे एसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये 90 टक्के वाढ झाली आहे. जून 2022 मध्ये कंपनीचा एयुएम 2,720 कोटी होता. जून 2023 मध्ये त्यात वाढ होऊन तो 5,176 कोटी रुपये झाला.
सूचना : हा म्युच्युअल फंडचा केवळ लेखाजोखा आहे. ही त्या फंडची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.