नवी दिल्ली : वाढत्या महागाईने एकदा पुन्हा सामान्य माणसाला झटका दिला आहे (LPG Gas Cylinder Price Hiked). घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरचे दर जारी केले आहेत. सिलेंडरचे दर 25 रुपये प्रति सिलेंडरने वाढले आहेत. व्यावसायिक सिलेंडरचे दर 6 रुपयांने घसरले आहेत. यापूर्वी कमर्शियल एलपीजी सिलेंडर (19 kg) च्या दरात 190 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आले होते (LPG Gas Cylinder Price Hiked).
आता घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 719 रुपये झाली आहे. हे नवे दर 5 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत
शहरं किंमत
दिल्ली 719 रुपये
मुंबई 719 रुपये
कोलकाता 745.50 रुपये
चेन्नई 735 रुपये
लक्षात असूद्या की, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारीला विना अनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नाही. मात्र, 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत 191 रुपयांची वाढ करण्यात आली. पण यानंतर 4 फेब्रुवारीला घरगुती एलपीजीच्या किंमती पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
दरम्यान, जानेवारीत 19 किलो व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमतीही वाढविण्यात आल्या होत्या. जानेवारीत त्यात 56 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये दोनदा किमती वाढवल्या गेल्या. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडर्सची किंमत 1241.50 रुपये होती. त्याचबरोबर त्याची किंमत 1 डिसेंबर रोजी 1296 रुपये करण्यात आली, तर 15 डिसेंबरला पुन्हा एकदा त्याची किंमत 1332 रुपये करण्यात आली.
जानेवारीमध्ये त्याची किंमत 1349 रुपये करण्यात आली. त्यामुळे 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1540 रुपयांत नागरिकांनी विकत घेतला. म्हणजेच एका महिन्यातच सुमारे 200 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा 1 फेब्रुवारीला किंमती वाढवण्यात आल्या. त्यावर आज पुन्हा गॅसच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पुन्हा वाढली LPG गॅस सिलेंडरची किंमतhttps://t.co/7hj5UZ2537#LPGPriceHike #lpg #GasPrice #Budget2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2021
LPG Gas Cylinder Price Hiked
संबंधित बातम्या :
LPG Gas Cylinder Price: फेब्रुवारीत LPG सिलिंडरच्या किमतीत मोठे बदल; किती पैसे द्यावे लागणार?
Budget 2021 | अर्थसंकल्पादिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, LPG गॅस सिलिंडर महागला
31 जानेवारीपर्यंत फ्रीमध्ये बुक करा सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड