LPG Subsidy Updates : एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जनता नाराज आहे. किचनचे बजेट वाढले आहे पण पगार मात्र त्या पटीने वाढत नाही. अलिकडेच विनाअनुदानित एलपीजीच्या किमतीत पुन्हा 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3.5 रुपयांनी वाढली होती. तेव्हा एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती.त्यापूर्वी एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये होती. महिनाभराआधीच सिलिंडरच्या किमतींनी एक हजार रुपायांच्या आकडा पार केला होता. त्यानंतर आता थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे गृहिणींच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे, त्यात 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी केली आहे. अशात उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभधारकांना गॅसवर सबसिडी ((lpg subsidy online check)) देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांच्या ही खात्यावर नाममात्र एलपीजी सबसिडी मिळते. परंतू, काही कारणाने ही सबसिडी बंद झाल्यास, LPG सबसिडी मिळत नसेल तर हे सोपे काम करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
विनाअनुदानित एलपीजी आता दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना (14.2 किलो सिलिंडर) 1053 रुपयांना उपलब्ध आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मिळत आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरसाठी 853 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala yojana) गरीब महिला लाभार्थ्यांना केंद्र सरकार अजूनही अनुदानाचा लाभ देत आहे. त्यांना सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा कमी दरात एलपीजी सिलिंडर देते.