नवी दिल्ली | 24 February 2024 : महेंद्र सिंह धोनी हा भारतीय टीमसाठी क्रिकेट खेळत नाही. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियापासून ते जाहिरात जगतापर्यंत धोनीची आजही क्रेझ आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या पण जास्त आहे. धोनी आता काय करतोय, आयपीएलशिवाय तो काय काम करतो याविषयीची अनेकांची उत्सुकता असते. क्रिकेटप्रमाणेच धोनीने या व्यवसायात नशीब आजमावलं आहे. या व्यवसायाने त्याला मालामाल केले आहे. तुम्ही सुद्धा हे व्यवसाय करुन कमाई करु शकता.
महेंद्र सिंह धोनीचा बिझनेस
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या कडकनाथ कोंबड्याच्या व्यवसायात आहे. कुक्कटपालनात त्याने आघाडी घेतली आहे. कडकनाथ कोंबड्याचे त्याच्याकडे मोठे पोल्ट्री फॉर्म आहे. देशात पोल्ट्री फार्म उद्योग वाढत आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असण्याची गरज नाही. काही लाखातच हा व्यवसाय उभारता येतो. पोल्ट्री फॉर्म उद्योग हा खास करुन गाव, निमशहरात आणि मोठ्या शहरांच्या आजूबाजूला जोम धरत आहे. चिकनसह अंड्यांची मागणी वाढल्याने या व्यवसायाने चांगलाच जम बसवला आहे.
होईल बंपर कमाई
मध्यप्रदेश मालामाल
कडकनाथ ही प्रामुख्याने मध्यप्रदेशातील कोंबडी आहे. पण ती आता देशभरातील अनेक राज्यात पोहचली आहे. कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय वाढला आहे. या कोंबडीचे मास चविष्ट असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे. या कोंबडीचे पंख, चोच, पाय, रक्त आणि मांस सर्व काळे असते. तर या कोंबडीचे अंडे सुद्धा काळे असते. यामध्ये साध्या कोंबडीपेक्षा अधिक प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात.