मुंबई : राज्याचा येत्या 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) आज (8 मार्च) विधानसभेत सादर केला जाणार आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे सर्वसामान्यांचे याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Budget 2021 Live Streaming Date Time When And Where To Watch FM Ajit Pawar speech live telecast)
बजेट म्हणजे काय?
राज्याचा अर्थसंकल्प हा वार्षिक ताळेबंद असतो, ज्यात विशिष्ट आर्थिक वर्षात अंदाजित कमाई आणि सरकारच्या अंदाजे खर्चाचा समावेश असतो.
2021-22 बजेट कोण सादर करेल?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. राज्याचा अर्थसंकल्प अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने तयार केला असून, तो अर्थमंत्री सादर करणार आहेत.
बजेट 2021 ची तारीख
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 विधानसभेत 8 मार्चला सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च 2021 रोजी सुरू झाले आहे. तर 8 मार्च 2021 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
बजेट 2021 वेळ काय?
2021 च्या अर्थसंकल्पातील कामकाज 8 मार्चला दुपारी 2 वाजता सुरू होईल.
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 कुठे पाहायचा?
राज्याचा अर्थसंकल्प 2021 चे विधानसभा टीव्ही आणि दूरदर्शन यांसारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. चालू लाईव्ह बजेट पाहण्यासाठी TV9 MARATHI च्या ट्विटर अकाऊंट आणि यू ट्युब चॅनेलला भेट देऊ शकता. यंदाच्या अर्थसंकल्पाचं प्रक्षेपण TV 9 MARATHI वरही होणार आहे. तसेच बजेट 2021 चे भाषण सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.
प्रत्येकाला दिवसभर टीव्हीसमोर बसणं अशक्य आहे. त्यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल बजेट पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. टीव्ही 9 मराठीवर बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. http://tv9marathi.com/live-tv या लिंकवर चॅनलही तुम्ही पाहू शकता. शिवाय आमच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह प्रक्षेपण असेल. (Maharashtra Budget 2021 Live Streaming Date Time When And Where To Watch FM Ajit Pawar speech live telecast)
संबंधित बातम्या :
Maharashtra Budget 2021 LIVE Updates | राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, सर्वसामान्यांचे लक्ष