Maharashtra Budget 2024 : प्रती दिंडी 20 हजार देणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार; अजितदादांची घोषणा

| Updated on: Jun 28, 2024 | 3:01 PM

Ajit Pawar Budget : २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रती दिंडी 20 हजार देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त बजेटमध्ये केली आहे.

Maharashtra Budget 2024 : प्रती दिंडी 20 हजार देणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार; अजितदादांची घोषणा
वारकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा
Follow us on

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा बजेट विधीमंडळात सादर केले आहे. त्यात त्यांनी पहिलीच योजना ही वारकऱ्यांच्या चरणी वाहिली. २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रती दिंडी 20 हजार देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त बजेटमध्ये केली आहे.

तुकोबारायांच्या अंभगाने सुरुवात

अर्थमंत्री अजित पवार यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अंभगाने त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधीमंडळ भक्तीमय झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या. देहूतून आजच तुकाराम महाराजांची पालखी निघाली. उद्या आळंदीतून ज्ञानेश्वरांची पालखी निघेल. महाराष्ट्राची जगभर ओळख दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

प्रती दिंडीला २० हजार देणार

२०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे,. मोफत औषध देणार आहोत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजितदादांनी यावेळी केली. अजितदादांनी केलेल्या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याने आणि मोफत औषध देण्यात येणार असल्याने वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधानांचं केलं अभिनंदन

एनडीएला बहुमत मिळालं आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार आलं आहे. पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. राज्याला सहकार्य करण्याची केंद्राने नेहमी भूमिका घेतली आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७६ हजार कोटीच्या वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. १० लाख रोजगार निर्माण होणार आहे.

भाविकांची लूट थांबणार

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आजपासुन उपहार गृह सुरू करण्यात आले आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मध्ये माफक दरात जेवण मिळणार आहे. पंढरपुरात भाविकांची हॉटेल धारकांकडून होणारी लूट आता थांबेल.
भाविकांना उपहारगृहात फक्त शंभर रुपयात पोटभर जेवण मिळेल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली.