कोणत्याही देशाचे चलन हे तिथली संस्कृती, इतिहास आणि गौरवाचे प्रतिक असते. तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणा या नोटेवर असतात. भारतात 10 रुपये ते 500 रुपयांपर्यंतच्या नोटेवर विविध प्रतिक चिन्हांकित केलेली आहे. त्यांचा वापर नोटांवर करण्यात आला आहे. देशातील विविध नोटांवर तिथल्या क्रांतीकारक, संस्थापक अथवा इतर व्यक्तींचे फोटो असतात. या कृतीद्वारे त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यात येतो. भारताच्या अनेक नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. पण देशाच्या पहिल्या नोटेवर कुणाचे चित्र होते, तुम्हाला माहिती आहे का?
भारतातील प्रत्येक नोटेवर महात्मा गांधी, अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन, पाकिस्तानमध्ये मोहम्मद अली जीना तर चीनमध्ये माओ झेडाँग यांचा फोटो नोटेवर असतो. पण भारताच्या नोटेवर सुरुवातीला महात्मा गांधी यांचा फोटो नव्हता. त्यानंतर त्यांचा फोटो लावण्याचा निर्णय झाला. काय आहे ही रोचक माहिती?
पहिल्या नोटेवर कुणाचा फोटो?
भारतीच्या पहिल्या नोटेवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र नव्हते. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय नोटांवर कोणते प्रतिक ठेवायचे यावर मंथन सुरू झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक प्रजासत्ताक देश झाला. त्या दरम्यान आरबीआयने नोटा छापल्या. भारत सरकारने 1949 मध्ये 1 रुपयांची नोट डिझाईन केली. त्यावर महात्मा गांधी यांचे छायाचित्र लावण्याची चर्चा रंगली. त्याविषयीचे डिझाईन पण जवळपास पूर्ण झाले. तर अखेरीस या नोटेवर सारनाथ येथील अशोक स्तंभाचे छायाचित्र छापण्याचे निश्चित झाले.
महात्मा गांधी यांचा फोटो केव्हा वापरात?
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष भारतीय नोटांवर भारताची समृद्ध परंपरा आणि प्रगती यांची प्रतीकं होती. 1950 आणि 1960 च्या नोटांवर वाघ, हरिण आणि इतर प्राण्यांची छायाचित्र होती. त्याशिवाय हीराकुंड धरण (Hirakud Dam) आणि आर्यभट्ट सॅटेलाईट (Aryabhatta Satellite) यांचे छायाचित्र नोटेवर होते. वर्ष 1969 मध्ये महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी निमित्त पहिल्यांदा त्यांचे छायाचित्र भारतीय रुपयांवर छापण्यात आले. या पहिल्या छायाचित्रात गांधीजी हे बसलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले. त्यांच्या पाठीमागे सेवाग्राम आश्रम (Sewagram Ashram) दाखवण्यात आला होता.
देवांच्या नावाची पण चर्चा
राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात 1987 मध्ये 500 रुपयांची नोट बाजारात आणण्यात आली. पहिल्यांदा महात्मा गांधी या 500 रुपयांच्या नोटेवर दिसले. आरबीआयने 1996 मध्ये महात्मा गांधी यांच्या नोटांची मालिका आणली. प्रत्येक नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र आले. तर जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, लक्ष्मी, गणपती या देवांना पण नोटेवर स्थान देण्याची चर्चा सुरू होती.