Share Market Dhoni | शेअर बाजार घसरणीचा ‘कॅप्टन कूल’ला पण फटका, इतके झाले नुकसान

| Updated on: Oct 27, 2023 | 6:43 PM

Share Market Dhoni | क्रिकेट मैदानात तुफान फटकेबाजी करणाऱ्या एमएस धोनी यांना शेअर बाजाराच्या पिचवर मात्र त्याला षटकार, चौकारचा पाऊस पाडता आला नाही. शेअर बाजाराच्या पडझडीचा त्याला फटका बसला. दस्तुरखुद्द कॅप्टन कूल यानेच त्याची माहिती दिली. त्याचा पोर्टफोलिओ घसरल्याचे त्याने सांगितले. माहीला इतका फटका बसला आहे.

Share Market Dhoni | शेअर बाजार घसरणीचा कॅप्टन कूलला पण फटका, इतके झाले नुकसान
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : महेंद्र सिंह धोनी याने क्रिकेटचे मैदान गाजवले. अनेक रेकॉर्डला त्याच्यामुळे झळाळी मिळाली. जागतिक स्तरावर तो नावाजला गेला. त्याच्या हटके स्टाईलची नेहमीच चर्चा राहिली. हे सर्व करताना तो जणू क्रिकेट व्यतिरिक्त काहीच विचार करत नसेल असा अनेकांचा समज होता. पण क्रिकेटचं मैदान गाजवणारा माही आता अनेक क्षेत्रात नाव काढत आहे. एका व्हिडिओतून तर तो शेअर बाजारातील कसलेला खेळाडू असल्याचे दिसून येते. पण शेअर बाजारात काही दिवसांपासून पडझड झाली आहे. त्याचा फटका कॅप्टन कूल याला पण बसलाा आहे. त्याचे ही नुकसान झाले आहे. त्यानेच ही माहिती दिली आहे.

कॉल पुट वरुन खेचले

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर माहीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यात त्याला शेअर बाजाराविषयी माहिती विचारण्यात आली. तेव्हा त्याने समोर बसलेल्या प्रेक्षकांना विचारले की कोणी कोणी कॉल पुट लावले आहे. त्यावर एकच खसखस पिकली. हे सर्वच लोक कॉल पुट लावून या कार्यक्रमासाठी आल्याची फिरकी महेंद्रसिंग धोनी याने घेतली आहे. त्याच्या या शाब्दिक कोटीला प्रेक्षक हासून दाद देताना दिसत आहेत.

किती झाले माहीचे नुकसान

शेअर बाजारात गेल्या दोन आठवड्यात घसरणीचे सत्र दिसून आले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. त्यांना आर्थिक नुकसान झाले. अनेक कंपन्यांचे शेअर घसरल्याने प्रत्येकाचा पोर्टफोलिओ घसरला. महेंद्रसिंग धोनी यांचा पोर्टफोलिओ पण घसरला. गेल्या दोन दिवसांत 8 टक्क्यांचा फटका बसल्याचे त्याने सांगितले. गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक लोकांच्या पोर्टफोलिओत 8-12 टक्क्यांची घसरण दिसून आली.


काय आहे कॉल-पुट

कॉल आणि पूट शेअर बाजारातील ट्रेडिंग करण्याची एक पद्धत आहे. फ्यूचर अँड ऑपशन्समध्ये हा प्रकार होतो. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निप्टी यासारख्या निर्देशांकात पुट आणि कॉलमध्ये व्यापार होतो. जर ट्रेडरला वाटले की बाजार घसरणार आहे तर तो पुट खरेदी करुन, वाट पाहतो. जर त्याला वाटले की बाजार वधारेल, त्यात तेजी येईल तर तो कॉल खरेदी करतो. ट्रेडिंगमध्ये कमी पैशात ज्यादा लॉट्समध्ये नफ्याचे गणित आजमावण्यात येते. पण एका अंदाजानुसार, 90 टक्के लोकांना यामध्ये मोठा फायदा होतो असे नाही, तर नुकसान सहन करावे लागते.

युट्यूबवर नाही व्हिडिओ

या कार्यक्रमाचा अधिकृत व्हिडिओ युट्यूबवर नाही. पण अनेक लोकांनी याची छोटी क्लिप शेअर केली आहे. आता हा व्हिडिओ धोनीचा असल्याने तो एकदम व्हायरल झाला. फॅन्सने धोनीला डोक्यावर घेतले आहे. या व्हिडिओत धोनीच्या उत्तराने खसखस पिकल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांत त्याचा पोर्टफोलिओत 8 टक्क्यांची घसरण झाल्याचे त्याने सांगितले.