नाताळआधीच अनेक बँका बंद, पुढच्या आठवडाभर तर बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, पाहा यादी

| Updated on: Dec 24, 2024 | 3:22 PM

देशभरात नाताळ निमित्ताने सर्व राज्यातील बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतू अनेक राज्यात सोमवारपासूनच बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

नाताळआधीच अनेक बँका बंद, पुढच्या आठवडाभर तर बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, पाहा यादी
Follow us on

उद्या २५ डिसेंबर रोजी नाताळ निमित्ताने देशभरातील सर्व राज्यातील बँका संपूर्णपणे बंद आहेत. परंतू आरबीआयने नाताळच्या सणाची सुट्टी केवळ २५ डिसेंबरला जारी केलेली आहे. तरीही सोमवारपासूनच अनेक राज्यात बँक हॉलिडे सुरु झाला आहे. ख्रिसमसच्या पूर्व संध्येला कोहीमा आणि आईजॉल येथे रिझर्व्ह बँकेच्या वतीने सुट्टी घोषीत केली आहे.तर ख्रिसमसच्या सणाला २५ डिसेंबरला प्रत्येक राज्यात आणि शहरातील बँकेच्या शाखा बंद ठेवण्यात येणार आहेत. चला तर पाहूयात कोणत्या दिवशी बँका सुरु होणार आहेत.

आजपासूनच सुट्ट्यांची सुरुवात –

साल २०२४ संपणार आहे. नवीन वर्ष २०२५ ची सुरुवात होणार आहे. यास केवळ आठवडाभराचा अवधी राहीलेला आहे. त्यामुळे तुमचे काही बँकांशी संबंधीत काही काम राहिले असेल तर घरातून निघण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली बँक हॉलिडेची लिस्ट एकदा नजरेखालून घाला. वास्तविक ख्रिसमस ईव्ह म्हणजे सोमवारपासूनच बँकांच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठ २७ डिसेंबरपर्यंत लागोपाठ बँका बंद रहाणार आहेत.

नाताळ निमित्ताने लागोपाठ ४ दिवस बँका बंद

नाताळ निमित्ताने आरबीआयने बँकांना जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीवर नजर टाकली तर वेगवेगळ्या राज्यात चार दिवस बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. उदाहरणार्थ २४ डिसेंबर रोजी कोहिमा आणि आईजॉल येथे बँका बंद राहणार आहेत. २५ डिसेंबर रोजी देशभरातील बँका नाताळ निमित्त बंद राहणार आहेत. त्यानंतर आरबीआयच्या यादीनुसार २६ डिसेंबर रोजी ऐजावल, कोहिमा आणि शिलाँग येथे ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी शिलाँग येथे सुट्टी घोषीत करण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

आता कधी उघडणार बँका ?

साल २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात बंपर हॉलिडे असल्याने वेग-वेगळ्या राज्यात ख्रिसमस आणि न्यू ईयर सह विविध आयोजनामुळे बँका बंद राहणार आहेत. २७ डिसेंबरपर्यंत ख्रिसमस सेलिब्रेशननंतर २८ आणि २९ डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवार येत आहे. त्यानंतर ३० डिसेंबरला U Kiang Nangbah निमित्ताने शिलाँगमध्ये आणि ३१ डिसेंबर रोजी गंगटोक आणि ऐजावलमध्ये न्यू ईयर इव्ह निमित्त बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.

बँकांना घोषीत केलेले सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी (Bank Holiday List) आरबीआयच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्ही (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) या लिंक वर देखील चेक करु शकता.

Other bank holidays in December 2024
December 28 – Fourth Saturday (pan India)
December 29 – Sunday (pan India)
December 30 – Monday – U Kiang Nangbah (Meghalaya)
December 31- Tuesday – New Year’s Eve/Lossong/Namsoong (Mizoram, Sikkim).

ऑनलाईन करा काम

केंद्रीय बँकांनी घोषीत केलेली सुट्टी विविध राज्यात वेगवेगळी असू शकते. कारण बँकांच्या सुट्ट्या त्या-त्या राज्यातील साजरे होणारे सण आणि त्या राज्यातील अन्य आयोजनांनुसार अवलंबून आहेत. तरीही बँकांच्या शाखा बंद असल्या तरी तुम्ही बँकांसंबंधीची तुमची कामे ऑनलाईन करु शकतो. ही सुविधा नेहमीप्रमाणे 24×7 तास चालू आहे. तुम्ही ऑनलाईन होणाऱ्या ट्रांझक्शनची कामे सहज करु शकता, त्यास काही अडचण येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही अडचण येणार नाही.