नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा करतील. त्याचा उत्साह देशभरात आतापासूनच आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने भाविकभक्त येणार आहेत. हा अभूतपूर्व सोहळा याच देहि, याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभावे यासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळणार आहे. गर्दीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा FMCG आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित बड्या कंपन्या घेणार आहेत. त्यांनी मंदिराच्या उद्धघाटनापूर्वीच आऊटलेट सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. अयोध्या आता बिझनेस हब होणार आहे.
अयोध्या जगाच्या नकाशावर
अयोध्येत राम मंदिराच्या उद्धघाटनानंतर राम मंदिर देशातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येणार आहे. देशातील कोट्यवधी जनता श्रीरामाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करणार आहे. अयोध्या येत्या काळात धार्मिक पर्यटन आणि तिर्थाटनासाठी महत्वाचे केंद्र ठरेल. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे. स्थानिक पातळीवर मोठी उलाढाल होणार आहे. अनेक हातांना यामुळे काम मिळेल. एफएमसीजी कंपन्या आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये मोठे बदल दिसतील. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांच्या कंपन्या अयोध्येत दाखल होत आहेत.
बिसलेरीपासून ते McD पर्यंत सर्वांनाच घाई
ईटीच्या रिपोर्टनुसार, FMCG आणि हॉस्पिटॅलिटीच्या कंपन्यांनी या ठिकाणी व्यावसाय थाटण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मिनरल वॉटर कंपनी बिसलेरी इंटरनॅशनल अयोध्येत नवीन प्रकल्प उभारत आहे. कंपनीच्या अंदाजानुसार या वर्षभरातच अयोध्येत बाटलीबंद पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्स, किराणा आणि इतर वस्तूंची मागणी अनेक पटीने वाढणार आहे. बिस्किट आणि एफएमसीजी उत्पादनातील अनेक कंपन्यांनी स्थानिक वितरण व्यवस्था वाढविण्याची कवायत सुरु केली आहे. पारले प्रोडक्ट्सने अयोध्या आणि जवळपासच्या भागातील वितरण प्रणाली वाढवली आहे. मॅकडोनाल्ड आणि बर्गर सिंह या कंपन्या अयोध्या-लखनऊ महामार्गावर नवीन आऊटलेट सुरु करत आहेत.
पर्यटकांची तोबा गर्दी