मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा; ‘मेटा’ शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणूक वाढवणार

| Updated on: Apr 28, 2022 | 12:30 PM

फेसबुकचे (Facebook) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गुंतवणुकीसंदर्भात आहे. मार्क झुकरबर्ग हे आता मेटाव्हर्स (Metavers) आणि शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममधील त्यांची गुंतवणूक वाढवणार आहेत.

मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा; मेटा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणूक वाढवणार
Follow us on

फेसबुकचे (Facebook) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गुंतवणुकीसंदर्भात आहे. मार्क झुकरबर्ग हे आता मेटाव्हर्स (Metavers) आणि शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममधील त्यांची गुंतवणूक वाढवणार आहेत. सध्या जगात शॉर्ट व्हिडिओचा ट्रेंड तेजीत असून, अशा प्लॅटफॉर्ममधील गुंतवणूक वाढवल्यास कंपनीच्या विस्तारासाठी त्याचा फायदा होऊ शकतो असे मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. सध्या जागतिक स्थरावर 1.96 अब्जांपेक्षा अधिक लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात, यापैकी 1.92 अब्ज युजर्स हे शॉर्ट -व्हिडीओ प्लॅटफॉर्म लाईक्स आणि फॉलो करतात त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक होणे महत्त्वाचे असल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. शॉर्ट व्हिडिओ हे एक संवादाचे अधुनिक साधन होऊ पहात आहे. इंस्टाग्रामवर घालवण्यात आलेल्या वेळेपैकी 20 टक्क्यांपेक्षा अधिक वेळ हा लोक रिल बणव्यासाठी खर्च करतात. फेसबूकवर देखील हा ट्रेंड चांगला सुरू आहे. येणाऱ्या काळात शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणूक वाढवल्यास त्याचा मोठा फायदा कंपनीच्या वाढीसाठी होऊ शकतो असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

मेटाच्या निव्वळ उत्पन्नात घट

फेसबुकची कंपनी असलेल्या मेटाच्या उत्पन्नामध्ये गेल्या तीन महिन्यात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्गे यांनी ही माहिती दिली आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांमध्ये महसुलात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे कंपनीचे निव्वळ उत्पन्न 21 टक्क्यांनी घसरून 7.47 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. कंपनींच्या उत्पनवाढीसाठी प्रयत्न सुरू असून, आता मेटा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नेमकं काय म्हणाले झुकरबर्ग?

झुकरबर्ग यांनी सांगितले की, सध्या युझर्स शॉर्ट व्हिडिओला पसंती देत आहेत. शॉर्ट व्हिडिओ हे संवादाचे नवीन प्रभावी माध्यम म्हणून समोर येत आहे. येत्या काळात शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मला चांगला स्कोप असेल सोशल मिडियावर घालवण्यात येणाऱ्या एकूण वेळापैकी सुमारे 20 टक्के वेळ हा शॉर्ट व्हिडिओ, रील पहाण्यात खर्च होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मेटा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत आहे.