नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market this week) गेल्या आठवड्यांत काही कंपन्यांच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात भर पडली. सेन्सेक्स वरील टॉप-10मधील आठ कंपन्यांचा मार्केट कॅपमध्ये (Market cap) 1,91,622.95 कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली. बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या गंगाजळीत सर्वाधिक भर पडली. एलआयसीला मात्र तोटा झाला आहे. गेल्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर निर्देशांकात 1,498.02 अंकांच्या वाढीसह 2.67 टक्क्यांची भर पडली. बजाज फायनान्सचा (Bajaj Finance) मार्केट कॅप 57,673.19 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,36,447.88 वर पोहोचला. टीसीएसच्या मार्केट कॅप मध्ये 47,494.49 कोटींची वाढ झाली आणि मार्केट कॅप 12,07,779.68 कोटींवर जाऊन पोहोचला.
एचडीएफसी बँकेचा मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 23,481.09 रुपयांच्या वाढीसह 7,97,251.18 कोटी रुपयावर पोहोचला. इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये देखील वाढ दिसून आली. इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये 18,219 कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली. इन्फोसिसचा मार्केट कॅप 6,52,012.91 कोटी रुपयांवर पोहोचला. एचडीएफसीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात मार्केट कॅप 14,978.42 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,31,679.65 वर पोहोचला. भारतीय स्टेट बँक (SBI) चा मार्केट-कॅप 12,940.69 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,71,397.99 कोटीवर पोहोचला.
सेन्सेक्स टॉप-10 कंपन्यांच्या सूचीत रिलायन्स इंडस्ट्रीजं स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआई, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि एलआयसी असा क्रम राहिला आहे.
“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचं संक्षिप्त स्वरूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 17 लाख कोटींहून अधिक आहे. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्व शेअर्सची एकूण बाजारातली किंमत 10 लाख कोटींपेक्षा अधिक असल्याचा अर्थ ध्वनित होतो.