नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट 1947 मध्ये देशाची फाळणी (Partition) झाली. त्यात अनेक कुटुंबाची वाताहत झाली. नकाशावर सीमा रेषा आखल्या गेली. रात्रीतूनच दोन देश तयार झाले. त्यात पाकिस्तान आणि भारत (Pakistan And India) हे दोन देश तयार झाले. पण या काळात अनेक कुटुंब बेघर झाली. त्यांना लाखोंची संपत्ती पाकिस्तानमध्ये टाकून जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला. जवळपास 1.45 कोटी लोकांना घरदार सोडून पलायन करावे लागले. पाकिस्तानमधून भारतात निर्वासीतांचे लोंढे आले. त्यांना छावण्यांमध्ये दिवस काढावे लागेल. त्यातील काहींनी नंतर भारतात नशीब आजमावले. कष्टाने दिवस पालटले. हिंमतीवर यश खेचून आणले. त्यांच्या या मेहनतीला तोड नाही. त्या जोरावर त्यांनी कोट्यवधींच्या कंपन्या, उद्योग उभारले. या कथा प्रेरणादायी आहे.
धर्मपाल गुलाटी, एमडीएच
महाशिया दी हट्टी म्हणजेच MDH कंपनीचे संस्थापक धर्मपाल गुलाटी यांना भारतात मसाल्यांचा बादशाह म्हटल्या जाते. त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये सियालकोट येथे झाला. 27 मार्च, 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला. दिल्लीत येऊन त्यांना टांगा चालवला. मिळेल ते काम केले. दाळी, तेल, मसाले विक्री केले. 1960 मध्ये किर्तीनगरमध्ये त्यांनी कारखाना सुरु केला. देशभरात एमडीएच मसाल्यांनी धुमाकूळ घातला. एमडीएचचे 60 पेक्षा अधिक उत्पादन बाजारात आहे. 2016 मध्ये त्यांना 21 कोटी रुपये पगार होता. त्यावेळी तो सर्वाधिक पगार होता. त्यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले.
रौनक सिंह, अपोलो टायर्स
रौनक सिंह यांचा जन्म 16 ऑगस्ट 1922 रोजी पाकिस्तानमध्ये झाला. लाहोर येथे स्टील ट्यूब्सचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. पण फाळणीमुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले. भारतात आल्यावर त्यांना एका छोट्या खोलीत 13 जणांसह त्यांना राहावे लागेल. सुरुवातीला त्यांनी एका मसाल्याच्या दुकानावर काम केले. त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने विकून कोलकत्ता येथे मसाला विक्री केला. पण पुढे स्टील कंपनीत त्यांनी नशीब काढले. स्टील ट्यूब तयार करणाऱ्या सीईओला ते भेटले. त्यांनी भारत स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीची सुरुवात केली. रौनक सिंह यांनी 1972 मध्ये अपोलो टायर्सन कंपनीची सुरुवात केली. रौनक सिहं याचे निधन 2002 मध्ये झाले.
मोती महल
मोती महल देशातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. आज त्याची चेन जगभर पसरली आहे. या रेस्टॉरंटची सुरुवाती दिल्लीतील दरियागंजमध्ये एका छोट्या दुकानातून झाली. जगाला तंदुरी चिकन आणि बटर चिकनची ओळख त्यांनी मिळवून दिली. या हॉटेलची सुरुवात 1948 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या तिघांनी केली होती. कुंदन लाल गुजराल, कुंदन लाल जग्गी आणि ठाकुर दास मागो यांनी त्याची सुरुवात केली. पत्नींचे दागिने विकून हा रेस्टॉरंट सुरु करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहर लाल नेहरु पण येथील जेवणाचे चाहते होते.