ईव्ही सेक्टरमधील या छोट्या कंपनीने मोठी कामगिरी बजावली आहे. Mercury EV Tech या कंपनीच्या शेअरने जोरदार मुसंडी मारली आहे. या कंपनीने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मंगळवारी सलग पाच व्यापारी सत्रात या शेअरने 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लावले आहे. गेल्या एका आठवड्यात या शेअरची किंमत आतापर्यंत 25 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली. या शेअरने पाच वर्षांत 1 लाख गुंतवणुकीवर 3.90 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
असा उंचावला शेअरचा आलेख
सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 83 टक्के आणि एका वर्षात 168 टक्के वाढ नोंदवली. गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक 38,900 टक्क्यांनी वधारला. या शेअरने गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. या दरम्यान ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, त्यांची गुंतवणूक आता 3,89,00000 रुपये इतकी झाली आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) कंपनीचा शेअर 132.60 रुपयांवर बंद झाला.
कंपनीने एका कंपनीचे अधिग्रहण केल्याने हा शेअर तेजीत आला. कंपनीने इलेक्ट्रिक तिचाकी वाहन निर्माता Haitek Automotive Private Limited मध्ये 70 टक्क्यांचा हिस्सा खरेदी केला. कंपनीने हे अधिग्रहण 35 लाख रुपयात केले. या नवीन घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये कंपनीचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. या शहरात तीन चाकी वाहनांचा व्यवसाय वाढत आहे. या ठिकाणी तीन चाकी वाहनांची मागणी वाढली आहे.
कंपनी ही अधिग्रहण प्रक्रिया पुढील 90 दिवसांत पूर्ण करण्याची शक्यता आहे. मर्क्युरी ईव्ही टेक कंपनीने त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळात काही नवीन बदल केले आहे. काही तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने काही राज्यात विस्तार योजनाची घोषणा केली आहे. या नवीन घडामोडींमुळे कंपनीची ईव्ही सेक्टरमधील स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.
काय करते कंपनी?
Mercury EV Tech ही भारतीय कंपनी आहे. इलेक्ट्रिक वाहन आणि इतर ऊर्जा उत्पादन निर्मिती आणि व्यापारात ही कंपनी पुढे आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक विंटेज कार आणि इलेक्ट्रिक गोल्फ कार या क्षेत्रात कंपनी आगेकूच करत आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.