Millionaire Tips : 6 वर्षांत व्हायचंय लखपती तर फॉलो करा या टिप्स, स्वप्न येईल प्रत्यक्षात

| Updated on: May 12, 2024 | 12:12 PM

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून सुरु होत आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय शोधत असला तर अनेक पर्याय आहेत. त्याआधारे तुम्ही 2030 पर्यंत लखपती अथवा करोडपती होऊ शकता. पण गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या..

Millionaire Tips : 6 वर्षांत व्हायचंय लखपती तर फॉलो करा या टिप्स, स्वप्न येईल प्रत्यक्षात
व्हा लक्षाधीश, कोट्याधीश
Follow us on

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून सुरु झाली आहे. आता तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा, विम्याचा आणि आर्थिक धोरणाचा लागलीच आढावा घेणे. नवीन रणनीती आखणे, पैसा वाढविण्यासाठी धोरण आखणे गरजेचे आहे. या आर्थिक वर्षात काही उद्दिष्ट्ये समोर ठेवत असाल तर तो दीर्घकालीन गुंतवणुकीतून होणाऱ्या फायद्याचा विचार करा. हे वर्ष इक्विटी, बाँड आणि सोन्यात अधिक रिटर्न देणारे ठरु शकते. 2030 पर्यंत लक्षाधीश, कोट्याधीश होण्यासाठी तशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

इक्विटी म्युच्युअल फंड

इक्विटी म्युच्युअल फंड हे शेअर बाजारात गुंतवणूक करतात. अधिक पैसा कमावू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे. गेल्या 10 वर्षांत लार्ज कॅप फंडाने जवळपास 14 टक्के प्रति वर्ष असा परतावा दिला आहे. तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांनी गेल्या 10 वर्षांत 20 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. पण हे फंड जोखिमयुक्त आहेत. एक कोटी रुपये कमवायचे असेल तर तज्ज्ञाच्या सल्ल्याने योग्य फंडात गुंतवणूक करता येईल. 50-70 हजारांची एसआयपी करुन पुढील 6 वर्षांत कोट्याधीश होता येईल. तर लखपती होण्यासाठी महिन्याकाठी त्यापेक्षा कमी गुंतवणूक करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

थेट इक्विटी गुंतवणूक

थेट शेअर बाजारात उतरण्यासाठी अनुभव, अभ्यास, योग्य निर्णय आणि संयमाची अत्यंत गरज असते. ज्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करत आहात, तिची आर्थिक स्थिती, तिचे भविष्यातील प्रकल्प, गुंतवणूक, संचालक मंडळात कोण व्यक्ती आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे. कंपनीविषयीच्या रोजच्या अपडेट माहिती असणे आवश्यक आहे. योग्य सल्लागाराची मदत आवश्यक आहे. तर तुम्ही कमी कालावधीत करोडपती, लखपती होऊ शकतात.

डेट म्युच्युअल फंड

डेट म्युच्युअल फंड हा केवळ बाँडमध्ये गुंतवणूक करतो. जोखिम कमी आणि परताव्याची हमी, असा हा फंड आहे. हा फंड 16 वेगवेगळ्या श्रेणीत आहे. यामध्ये 3 वर्षे ते 7 वर्षांपर्यंतची गुंतवणूक करता येते. व्याजदरातील चढउतारानुसार परतावा मिळतो. दहा वर्षांतील परतावा 6-8 टक्क्यांदरम्यान मिळतो. जर मोठे उद्दिष्ट प्राप्त करायचे असेल तर मासिक 88,000 ते एक लाखापर्यंत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

आवर्ती ठेव योजना

बँक रिकरिंग डिपॉझिट मध्ये जास्त बचत करणे फायदेशीर ठरते. एका ठराविक कालावधीत तुम्हाला गुंतवणुकीचा पर्याय देण्यात येतो. 7 वर्षांच्या आवर्ती मुदत ठेव योजनेवर 6.50 ते 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. 1 कोटींचा फंड जमवायचा असेल तर 95 हजार रुपये मासिक बचत करणे गरजेचे ठरेल. जमा व्याजवर टीडीएस कपात होते. तसेच काही कर पण कपात होतो.

गोल्ड फंड -बाँड

गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते. या पाच वर्षांत या फंडने जोरदार परतावा दिला आहे. पाच वर्षांत 16 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या फंडने गेल्या दहा वर्षांत लार्ज कॅप, इक्विटीपेक्षा 8 टक्के अधिक परतावा दिला आहे. यंदा सोन्याच्या किंमती अजून उसळी घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार, तुमचे लक्ष्य निर्धारीत करुन गुंतवणूक करा.

सूचना : गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.