Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्चा तेलात सध्या नरमाईचे सत्र सुरु आहे. भावात मोठी उलथापालथ झालेली नाही. कंगाल पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. पण तुमच्या खिशावरील ताण काही कमी झाला नाही.
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात नरमाईचे सत्र सुरु आहे. सध्या क्रूड ऑईलमध्ये (Crude Oil) मामूली घसरण झाली. ओपेक प्लस संघटनांनी महागाईच्या आगीत तेल न ओतल्याने भाव स्थिर आहे. कंगाल पाकिस्तानमध्ये तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात भडकल्या होत्या. पण तिथल्या सरकारला कर्जाची खेप मिळताच, त्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये 15 दिवसांसाठी मोठी कपात केली. पण तुमच्या खिशावरील ताण काही कमी झाला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळीच इंधनाचे दर जाहीर केले. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव(Petrol Diesel Price) किती आहे, घ्या जाणून…
क्रूड ऑईलचा भाव
आज 21 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण कामय आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.55 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 75.58 डॉलर प्रति बॅरल झाले.