BOM Loan News : बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank Of Maharashtra) त्यांच्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. बँकेने ग्राहकांसाठी (Consumer) खास मान्सून ऑफर आणली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.35 टक्के कपात केली आहे. या घाडमोडींची विंत्तबातमी महाबँकेने शेअर बाजाराला दिली. हे नवीन कर्ज दर 10 जुलै 2022 रोजीपासून प्रभावीपणे लागू होतील असे बँकेने शेअर बाजाराला (Share Market) कळविले आहे. 10 जुलै रोजी एमसीएलआरमध्ये सुधारणा केल्याचे कळविले. बँकेने सांगितले की, एक वर्षाच्या कालावधीत एमसीएलआरमध्ये 0.20 टक्क्यांची इतकी कपात (Reduce) करण्यात आली आहे. सध्य एमसीएलआर हा 7.50 टक्के राहिल. यापूर्वी बँकेचा एमसीएलआर हा 7.70 टक्के होता. एमसीएलआर हा ग्राहकांच्या कर्जाचे दर ठरविण्याचा मापदंड आहे. या नवीन धोरणाचा बँकेच्या लाखो ग्राहकांना फायदा होईल. त्यामुळे कर्ज स्वस्त होईल आणि ग्राहकांचे कर्जाचे हप्ते कमी होईल. नवीन दर लगेच लागू झाल्याने त्याचा फायदा पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांचे हप्ते घटल्याने बचत होईल.
तज्ज्ञांच्या मते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया MPC दरांमध्ये वाढ करु शकते. कारण सध्या महागाई म्हणावी तशी कमी झाली नाही. उलट महागाई वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महागाईचा दर 7.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय बँकेने पहिल्या तिमाहीत महागाई दर 7.5 टक्के, दुस-या तिमाहीत तो 7.4 टक्के तर तिस-या तिमाहीत महागाई दर 6.2 टक्के राहण्याची आणि चौथ्या तिमाहीत हा दर 5.8 टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे.