नवी दिल्ली : अमेरिकेने स्वतःला डिफाल्टर होण्यापासून वाचवले आहे. परंतु, नोकरी कपात काही थांबली नाही. एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे दीड लाख जण बेरोजगार झालेत. मे मध्ये एप्रिलच्या तुलनेत सुमारे १३ हजार नोकऱ्या जास्त गेल्या. गेल्या वर्षी आणि यंदा नोकऱ्या जाण्याची तुलना केली तर चार पट नोकऱ्या यंदा गेल्या आहेत. अमेरिकेत मंदी सुरू झाली आहे. मे महिन्यात आर्टिफिशीयल इंटॅलिजन्सने सुमारे ३ हजार ९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. पाहुया अमेरिकेत नोकऱ्या कमी होण्याची नेमकी आकडेवारी काय आहे.
एग्झीक्युटीव्ह कोचिंग फर्म चॅलेंजर, ग्रे अँड क्रिसमस इंकनुसार, अमेरिकी कंपन्यांनी यंदा मेमध्ये २०२२ चा रेकॉर्ड तोडला. नोकऱ्यांमधील कपात मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिकी इम्पायर्सने मेमध्ये ८० हजार ८९ लोकांना नोकरीवरून कमी केले. गेल्या वर्षी याच महिन्यात २० हजार ७१२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकर कपातीची टक्केवारी २८७ टक्के दिसते.
यंदा एप्रिलमध्ये अमेरिकी कंपन्यांनी ६६ हजार ९९५ कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले. रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात ८० हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्यात आले. त्यापैकी ३ हजार ९०० लोकांना आर्टिफिशीयल इंटॅलिजन्समुळे नोकरी गमवावी लागली.
रिटेलर सेक्टरमध्ये मे महिन्यात ९ हजार ५३ जणांना कमी करण्याचे जाहीर केले आहे. रिटेलरने यावर्षी आतापर्यंत ४५ हजार १६८ रुपयांची कपात केली आहे. मीडिया इंडस्ट्रीत २०२३ मध्ये आतापर्यंत १७ हजार ४३६ जणांची कपात करण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात जास्त रेकॉर्ड आहे.
बँकिंग सेक्टर मध्येही नोकर कपात सुरू आहे. मे महिन्यात ३६ हजार ९३७ नोकर कपातीची घोषणा केली होती. हेल्थ केअर, प्रोडक्ट्स मेकर्सनेसुद्धा ३३ हजार ८५ कर्मचारी कपात मे महिन्यात केली.