MS Dhoni Birthday : क्रिकेटरच नाही तर गुंतवणुकीतही कॅप्टन कूल अग्रेसर; या कंपन्यांमधून होते जोरदार कमाई

| Updated on: Jul 07, 2024 | 10:06 AM

MS Dhoni Investment : आज 7 जुलै रोजी महेंद्र सिंह धोनी 43 वर्षांचा झाला. क्रिकेटर म्हणूनच नाही तर एक उद्योजक आणि गुंतवणूकदार म्हणून पण त्याने नाव कमावले आहे. त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून त्याला जोरदार कमाई होते.

MS Dhoni Birthday : क्रिकेटरच नाही तर गुंतवणुकीतही कॅप्टन कूल अग्रेसर; या कंपन्यांमधून होते जोरदार कमाई
धोनी गुंतवणुकीतही कॅप्टन
Follow us on

भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याचा आज वाढदिवस आहे. तो आता 43 वर्षांचा झाला आहे. त्याचे पहिले प्रेम क्रिकेट असले तरी त्याने आयुष्याच्या या टप्प्यावर इतर क्षेत्रातही नशीब चमकवले आहे. धोनी आता एक यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार ठरला आहे. त्याने देशातील अनेक उभरत्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्यामध्ये कपडे, हॉटेल, स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्यांचा भरणा आहे. त्यामाध्यमातून त्याची जोरदार कमाई होते.

स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीत गुंतवणूक

महेंद्र सिह धोनी याची ‘रीति स्पोर्ट्स’ नावाच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीत वाटा आहे. ही कंपनी जगातील बड्या खेळाडूंचे मॅनेजमेंट सांभाळते. बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा अगुवा फाफ डुप्लेसी, भारतीय संघाचा कप्तना रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे त्यांचे क्लायंट आहेत.

हे सुद्धा वाचा

अनेक व्यवसायात आजमावलंय नशीब

1. धोनीने 2016 मध्ये कपडे आणि फुटवेअर ब्रँड सेव्हन लाँच केला होता. ही धोनीची कंपनी आहे. याशिवाय खाद्य आणि पेय स्टार्टअप 7 In Brews मध्ये पण गुंतवणूक आहे. त्यांनी ‘कॉप्टर 7’ नावाने एक चॉकलेट ब्रँड पण लाँच केला आहे. धोनी स्पोर्ट्सफिट नावाने एक फिटनेस चेन संपूर्ण देशभर आहे. त्यात देशात 200 हून अधिक फिटनेस चेन उघडण्यात आले आहेत.

2. धोनी चित्रपट उद्योगात पण नशीब आजमावत आहे. धोनी एंटरटेनमेंट नावाने त्याने एक प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. या प्रोडक्शन हाऊसने लेट्स गेट मॅरिड या एका तामिळ चित्रपटात गुंतवणूक केली आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर झळकले आहे.

3. महेंद्र सिंह धोनी याने शाका हॅरी नावाच्या एका स्टार्टअपमध्ये पण गुंतवणूक केली आहे. ही कंपनी प्लँट-बेस्ड प्रोटीन तयार करण्याचे काम करते. शाका हॅरी या स्टार्टअपमध्ये धोनीशिवाय इतर पण अनेक दिग्गजांनी गुंतवणूक केली आहे.

4. धोनीने एक टेक्नॉलॉजी कंपनी गरुड एअरोस्पेसमध्ये पण गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. ही कंपनी ड्रोन तयार करण्याचे काम करते. हॉटेल व्यवसायात पण धोनीने पाऊल ठेवले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये माही रेसिडेंसी नावाने त्याने एक हॉटेल उघडले आहे. त्याचे हे एकमेव हॉटेल आहे.

किती आहे नेटवर्थ

कॅप्टन कूल याने 10 हून अधिक उद्योग आणि स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 1030 कोटींच्या घरात आहे. धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. या फ्रॅचाईंजमधून त्याला वार्षिक 12 कोटी रुपये मिळतात. याशिवाय टीव्हीवरील जाहिरातीतून त्याला बक्कळ कमाई होते. त्याने उत्तराखंडमध्ये नुकतेच एक शानदार घर खरेदी केले. त्याची किंमत 18 कोटींच्या घरात आहे.