Reliance New Plan : देशातील सर्वात मोठी कंपनी 10 लाख कोटींचे मार्केट कॅप असणारी रिलायन्स केवळ पेट्रोकेमिकल, टेलिकॉम वा रिटेल बिझनेसपर्यंत मर्यादीत नाही. आता तिचे वारु चौफेर उधळले आहे. या कंपनीचा विस्तार सातत्याने होत आहे. अनेक परदेशी आणि देशातील ब्रँड रिलायन्सच्या पंखाखाली आले आहेत. मुकेश अंबानी यांचे तीनही मुलं व्यवसायाची कमान सांभाळत आहेत. रिलायन्सच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीकडे सर्व उद्योग जगताचे लक्ष लागले होते. त्यातील काही योजनांमुळे आता बँकांची झोप उडाली आहे. तर ईशा अंबानीच्या नवीन व्यवसायाने टाटा समूहाचे टेन्शन वाढवले आहे.
गृहकर्जाच्या मैदानात रिलायन्स
देशात सरकारी, खासगी बँका आणि वित्तीय संस्था या गृहकर्ज देतात. आता रिलायन्सची जिओ फायनेन्शिअल सुद्धा गृहकर्ज देणार आहे. कंपनीने आता अखेरच्या टप्प्यात दाखल झाली आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजने याविषयीची एक घोषणा केली आहे. ही एक वित्तीय संस्था आहे. लवकरच कंपनी ग्राहकांना गृहकर्जाचा पुरवठा करणार आहे. गृहकर्जासोबतच कंपनी ग्राहकांना मालमत्ता तारण कर्ज आणि इतर कर्जाचे वाटप करेल. अर्थात जिओ फायनान्सने अगोदरच जागतिक संस्थांशी हातमिळणी केलेली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानासह झटपट कर्ज देण्यात जिओ आघाडी घेण्याची शक्यता आहे. गृहकर्ज क्षेत्रात आमुलाग्र बदल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईशा अंबानीने वाढवली टाटाची टेन्शन
तर ईशा अंबानीने टाटा समूहाची चिंता वाढवली आहे. रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानी हिच्यावर आहे. रिलायन्स रिटेल एका क्युरेटेड डिझाईन आधारी लक्झरी ज्वेलरी सेगमेंटमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती तिने या बैठकीत दिली. या बैठकीतील या वृत्ताने टाटाच्या कॅरेटलने आणि इतर ज्वेलरी ब्रँडचे टेन्शन वाढले आहे. टाटाची कॅरेटलेन हा ब्रँड पूर्वीपासूनच या क्षेत्रात आहे. या ब्रँडचे देशातील 100 हून अधिक शहरात स्टोर आहेत. रिलायन्स या क्षेत्रात उतरणार असल्याने स्पर्धा तीव्र होणार आहे. रिलायन्स रिटेलचे अनेक शहरात स्टोर आहेत. त्या चेनमध्ये ज्वेलरी ब्रँडचे पण दालन सुरु होऊ शकते.