मुंबई : रिलायन्स समुहाचे चेयरमन मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3,80,700 कोटी रुपये इतकी आहे (Mukesh Ambani the Richest Indian). आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीनुसार (IIFL Wealth Harun India list) लंडन येथील एसपी हिंदुजा आणि त्यांचं कुटुंब 1,86,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विप्रोचे अजीम प्रेमजी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,17,100 कोटी रुपये आहे.
भारतीय श्रीमंतांच्या यादीत (IIFL Wealth Harun list) आर्सेलरमित्तलचे सीईओ लक्ष्मी निवास मित्तल 1,07,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 94,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत गौतम अडाणी पाचव्या स्थानावर आहेत. 94,100 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत उदय कोटक सहाव्या स्थानावर आहेत. 88,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत सायरस एस पूनावाला सातव्या स्थानावर आहेत. 76,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत सायरस पल्लोनजी मिस्त्री आठव्या क्रमांकावर आहेत. 76,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत शापोरजी पल्लोनजी नवव्या स्थानावर आहेत. तर, 71,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत दिलीप सांघवी दहाव्या स्थानावर आहेत.
यंदा श्रीमंतांच्या संख्येत वाढ
यंदाच्या यादीत (IIFL Wealth Harun list 2019) 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या वाढली आहे. 953 भारतीयांची संपत्ती ही 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2018 मध्ये ही संख्या 831 होती. तर डॉलर मुल्यात अरबपतींची संख्या ही 141 वरुन 138 वर आली आहे.
रिपोर्टनुसार, देशातील पहिल्या 25 श्रीमंतांची एकूण संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या (GDP) 10 टक्के आहे. तर 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या 953 श्रीमंतांची संपत्ती देशाच्या जीडीपीच्या 27 टक्के आहे.
श्रीमंतांच्या संपत्तीत 2 टक्क्यांनी वाढ
आयआयएफएल वेल्थ हुरुनच्या यादीनुसार, यावर्षी श्रीमंतांच्या एकूण संपत्तीत दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, सरासरी मालमत्ता वाढ 11 टक्क्यांनी घटली आहे. यादीमध्ये असलेल्या 344 श्रीमंतांच्या संपत्तीत यावर्षी घट झाली आहे. तर 112 श्रीमंत असे आहेत ज्यांची संपत्ती 1,000 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.
मुंबईत सर्वात जास्त श्रीमंत
रिपोर्टनुसार, 246 म्हणजेच 26 टक्के भारतीय हे मुंबईत राहातात. दिल्लीत 175 श्रीमंत राहतात, तर बंगळुरुमध्ये 77 श्रीमंत राहतात.
यादीत 82 अनिवासी भारतीयांचाही समावेश
या यादीत 82 अनिवासी भारतीय आहेत. यापैकी 76 टक्के लोकांनी स्वत:च्या क्षमतेवर हे स्थान मिळवलं आहे. अनिवासी भारतीयांचा आवडता देश अमेरिका आहे. अमेरिकेत 31 श्रीमंत भारतीय राहतात. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात आणि ब्रिटन यांचा क्रमांक लागतो.
ओयोचे रितेश सर्वात कमी वयाचा अरबपती
ओयो रुम्सचे रितेश अग्रवाल 7,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत सर्वात कमी वयाचे (वय 25) अरबपती आहेत.
यादीत 152 महिलांचाही समावेश
या यादीत 152 महिलांचाही समावेश आहे. त्यांचे सरासरी वय 56 वर्षे आहे. एचसीएल टेक्नॉलॉजिज च्या 37 वर्षीय रोशनी नडार सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. त्यांच्यानंतर गोदरेज समुहाच्या स्मिता वी. कृष्णा (वय 68)यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 31,400 कोटी रुपये आहे. 18,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत बायोकॉनच्या किरण मजूमदार या स्वत: च्या बळावर हे स्थान मिळविणाऱ्या सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत.
संबंधित बातम्या :
डेटा विकणं तेल विकण्यासारखं नाही, फेसबुकचं मुकेश अंबानींना उत्तर
मुकेश अंबानींपेक्षा नातेवाईकांची कमाई जास्त, महिन्याचा पगार तब्बल….