नवी दिल्ली | 30 January 2024 : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) शेअर सोमवारी उसळले. या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेटवर्थ, एकूण संपत्तीत 6.86 अब्ज डॉलरची वाढ झाली. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 11 व्या स्थानावर पोहचले. सोमवारी अंबानी सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले. त्यांची संपत्ती 108 अब्ज डॉलरवर पोहचली. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात 11.3 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली. तर गौतम अदानी हे 100 अब्ज डॉलर क्लबच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सोमवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये 4.28 अब्ज डॉलरची भर पडली.
कोणाच्या खिशात किती डॉलर
गौतम अदानी
तर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी पण मागे नाहीत. अदानी यांच्या नेटवर्थमध्ये सोमवारी 4.28 अब्ज डॉलरची भर पडली. आता त्यांची संपत्ती 95.9 अब्ज डॉलरवर पोहचली. यंदा त्यांच्या नेटवर्थमध्ये 11.6 अब्ज डॉलरची भर पडली. कमाईच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग यांच्यानंतर अदानी यांचा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्ग रिसर्च कंपनीच्या एका रिपोर्टनंतर या समूहात मोठा भूकंप आला होता.