नवी दिल्ली | 6 March 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या धाकट्या चिरंजीवांचे दोनाचे चार हात होणार आहेत. 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका मर्चेंट यांचे लग्न होईल. त्यापूर्वी गुजरातमधील जामनगर येथे प्री-वेडिंग सोहळा झाला. 1-3 मार्च दरम्यान हा कार्यक्रम झाला. अर्थात पाण्यासारखा पैसा येथे वाहला. अनेक सेलेब्रिट या कार्यक्रमात थिरकले. अब्जाधीश पॉपस्टर रिहानाने पण मंचावर ठुमके लावले. तिच्या तालावर अंबानी कुटुंबिय नाचले. हे कौडकौतुक तुम्ही टीव्ही, मोबाईल स्क्रीनवरुन पाहिले. रिहाना हिला या परफॉर्मन्ससाठी 74 कोटी मोजल्याची चर्चा आहे. केवळ याच कारणासाठी ती थिरकली नाही, हे मात्र नक्की…
रिहाना महागडी गायिका
तर Rhianna ही महागडी पॉप गायिका आहे. तिच्या गाण्यावर तरुणाईच्या उड्या पडतात. तर जामनगरमध्ये तिने परफॉर्मन्स सादर केला. त्यासाठी तिला 74 कोटी रुपयांची बिदागी देण्यात आली. रिहाना ही जगातील महागड्या गायिकांपैकी एक आहे. तिची नेटवर्थ ही जवळपास 1.4 अब्ज डॉलर इतकी आहे. पण केवळ गायन आणि स्टेज शोजच नाही तर तिच्या कंपनीतून पण तिला बक्कळ कमाई होती.
रिहानाचे रिलायन्सशी कनेक्शन
रिहाना केवळ परफॉर्मन्ससाठी भारतात आली नव्हती. तर रिलायन्ससोबत तिचे खास कनेक्शन आहे. रिलायन्स रिटेल ही भारतातील किरकोळ साहित्य, सामान, वस्तू विक्री करणारे मोठे नेटवर्क आहे. रिहाना पण या नेटवर्कशी जोडल्या गेलेली आहे. तिच्या कंपनीचा भारतातील व्यापार, व्यवसाय रिलायन्सच्या भरवशावरच सुरु आहे.
रिलायन्स आले मदतीला
Rhianna Fenty Beauty हा या परदेशी पाहुणीचा कॉस्मेटिक वस्तूंचा व्यवसाय आहे. श्रीमंत वर्गात हा ब्रँड लोकप्रिय आहे. या लक्झरी ब्रँडची उत्पादने जगभरात विक्री होतात. रिहाना, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या कंपनीच्या मदतीने हा व्यवसाय करते. भारतात सेफोरो स्टोअर्समध्ये रिहानाचे उत्पादनं मिळतात. तर ही कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या ताब्यात आहे. Fenty Beauty ची उत्पादनं रिलायन्स रिटेलद्वारे भारतात विक्री होतात. तर असे हे कनेक्शन आहे.