नवी दिल्ली | 5 March 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे जुलै महिन्यात मुंबईत लग्न होणार आहे. त्यापूर्वी 1-3 मार्च दरम्यान जामनगर येथे विवाहपूर्व सोहळा रंगला. यामध्ये जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. अंबानी कुटुंबाची सून होणाऱ्या राधिकाचे वडील अनंत मर्चेंट पण श्रीमंत उद्योगपती आहेत. ते एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आहेत. ही देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. वृत्तानुसार, एनकोर कंपनी वार्षिक 6 अब्जाहून अधिक टॅबलेट तयार करते. वीरेन मर्चेंट इतर अनेक कंपन्यांचे संचालक पण आहेत. मर्चेंट कुटुंबिय मुळचे गुजरातमधील कच्छ भागातील आहे.
असा आहे पसारा
16 जानेवारी 1967 रोजी जन्मलेले वीरेन मर्चेंट मुंबईतच वाढले. पदवीनंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. ते एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत. यासोबतच एनकोर नॅचरल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, एनकोर बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, एनकोर पॉलिफ्रँक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ZYG फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, साई दर्शन बिझनेस सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेडसह अनेक कंपन्यांचे ते संचालक आहेत. ते प्रसिद्धीपासून चार हात दूर असतात. त्यांची एकूण नेटवर्थ जवळपास 750 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. वीरेन आणि शैला हे यशस्वी उद्योजक जोडपे आहे. त्यांनी एनकोर हेल्थकेअरची सुरुवात 2002 मध्ये केली होती.
राधिकाची नेटवर्थ
18 डिसेंबर1994 रोजी राधिकाचा जन्म झाला. तिने न्युयॉर्क विद्यापीठातून पदवी मिळवली. तिने इंडिया फर्स्ट या संस्थेत उमेदवारी केली. रिअल इस्टेट कंपनी Isprava मध्ये तिने कनिष्ठ विक्री अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ती कुटुंबाच्या उद्योगात शिरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका ही आलिशान जीवन जगते. तिला महागड्या बॅग खरेदी करण्याचा छंद आहे. ती अत्यंत स्टाईलिश आहे. ती 8 ते 10 कोटींची मालकीण असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो.
अनंत-राधिका यांचा रेकॉर्ड
मीडियातील वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात जवळपास 1,000 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे लग्न कुटुंबातील सर्वात महागडे लग्न असेल. तर देशातील पण महागडे लग्न ठरेल. ईशाच्या लग्नात मिक्का सिंग याने 10 मिनिटांच्या शो साठी दीड कोटी रुपये घेतले होते.