नवी दिल्ली | 2 March 2024 : लवकरच ही कंपनी रिलायन्सच्या ताफ्यात येऊ शकते. गेल्या तीन ते चार वर्षात रिलायन्सचा पसारा विस्तारत चालला आहे. सातत्याने नवनवीन कंपन्या, अनेक ब्रँड्स या समूहात येत आहे. मुलीच्या नावे रिटेल व्हेंचर केल्यापासून अनेक देशी आणि जागतिक ब्रँड दाखल झाले आहेत. आता फ्युचर सप्लाई चेन सोल्यूशन्स पण रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये सामावून घेण्याची पुन्हा संधी आली आहे. यापूर्वी पण हा समूह ताब्यात घेण्यासाठी रिलायन्सने जोमाने खेळी खेळली होती.
NCLT कडून दिलासा
फ्युचर समूहाची कंपनी फ्युचर सप्लाई चेन सोल्यूशन्स लवकरच रिलायन्स समूहात येऊ शकते. ही कंपनी किशोर बियाणी यांची आहे. या समूहाने खुप सुवर्णकाळ अनुभवला आहे. पण नंतर हा समूह दिवाळखोरीत गेला. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीला राष्ट्रीय कंपनी न्यायाधीकरणाने 45 दिवसांचा वेळ दिला आहे. याशिवाय लोन इंडिया ही कंपनी पण या शर्यतीत अग्रेसर आहे.
कंपनी ताब्यात घेण्यासाठी यांच्यात चुरस
कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. कंपनीसाठी अधिकाधिक बोली लावता यावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 45 दिवसांचा अतिरिक्त वेळ मागण्यात आला होता. बोलीदारांची संख्या यामुळे वाढली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, लोन इंडिया, सिटी इन्फ्रास्ट्रक्चर, ग्लोब इकोलॉजिस्टिक्स, ट्रक्स लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स आणि सुगना मेटल्स या दिवाळखोरीच्या प्रक्रियाच्या माध्यमातून कंपनी अधिग्रहणासाठी प्रयत्न करत आहे.
कंपनीवर किती उधारी
गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी फ्युचर सप्लाई चेन सोल्यूशन्सच्या दिवाळखोरीची प्रक्रिया एका अर्जानंतर सुरु झाली होती. कंपनीने जवळपास 7.26 कोटी रुपयांची थकबाकी चुकती केलेली आहे. कंपनीवर अजून एकूण 885 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मुख्यत्वे अझीम प्रेमजी ट्रस्टचे 274 कोटी रुपये, डीएफसी फर्स्ट बँकेचे 158 कोटी रुपये, जेसी फ्लावर्स एसेट रिकंस्ट्रक्शनचे 63 कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 45 कोटी रुपयांचा समावेश आहे.
कंपनीचा शेअर
शेअर बाजारात फ्चुचर सप्लाई चेन सोल्यूशन्सचा शेअर आहे. त्याची किंमत सध्या 8.15 रुपये आहे. हा शेअर 52 आठवड्यातील निच्चांकावर पोहचला आहे. या शेअरने गेल्या वर्षी मार्च महिन्यात 18.20 रुपयांचा पल्ला गाठला आहे. हा या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक आहे.