नवी दिल्ली | 25 February 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे लहान पुत्र अनंत अंबानी याचे लग्न होत आहे. या लग्नाला देश-विदेशातील मोठं-मोठ्या व्यक्ती हजर राहणार आहेत. अनंत अंबानी याचे लग्न जुलै महिन्यात होत आहे. पण विवाहसंबंधीचे कार्यक्रम 1 मार्चपासून तीन दिवसांसाठी सुरु होत आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नापूर्वी काही कार्यक्रम होत आहे. त्यात उद्योगपती, सिने कलाकार यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्योगपती गौतम अदानी आणि सुनील भारती मित्तल सहभागी होतील. तर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचे पण नाव यादीत आहे. या दिग्गजांसह क्रिकेटर सचिन तेंडुलकर, एम एस धोनी यांना पण निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
तंबूत पाहुण्याची व्यवस्था
जामनगरमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी तेल रिफायनरी आहे. अनंत अंबानीचे लग्न राधिका मर्चेंट हिच्यासोबत होत आहे. राधिका एनकोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची छोटी मुलगी आहे. जामनगरमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल नाही. त्यामुळे मुकेश अंबानी या श्रीमंत पाहुण्यांची व्यवस्था अल्ट्रा लक्झरी टेंटमध्ये करणार आहे. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा असतील.
यादीत हे दिग्गज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, एडोबचे सीईओ शांतनु नारायण, वॉल्ट डिज्नीचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, एडनोकचे सीईओ सुलतान अहमद अल जाबेर सहभागी होतील. भारतीय उद्योग जगतातील दिग्गज गौतम अदानी आणि कुटुंबिय, टाटा सन्सचे चेयरमन नटराजन चंद्रशेखरन, आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंबिय, गोदरेज कुटुंब, इन्फोसिसचे प्रमुख नंदन नीलेकणि, आरपीएसजी समूहाचे मुख्य संजीव गोयनका, विप्रोचे ऋषद प्रेमजी, बँकर उदय कोटक यांना पण आमंत्रण देण्यात आले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला, एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल, हिरो कंपनीचे पवन मुंजाल, एचसीएलच्या रोशनी नादर, झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत, उद्योजक रोनी स्क्रूवाला आणि सन फार्माचे दिलीप सांघी यांनी पण निमंत्रण देण्यात आले आहे.
क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज सहभागी
या यादीत क्रिकेटर सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, रोहित शर्मा, के एल राहुल, हार्दिक आणि क्रुणाल पांड्या, इशान किशन यांचे नाव आहे. मेगा स्टार अमिताभ बच्चन अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना, अजय देवगण आणि काजोल, सैफ अली खान, चंकी पांडे, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ हे पण सहभागी होतील. यादीत माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने, आदित्य आणि राणी चोपडा, करण जोहर, बोनी कपूर, अनिल कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि करिश्मा कपूर, रजनीकांत हे सहभागी होतील.