Multibagger Share : कोल्हापूरच्या साडी तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना लावली लॉटरी; 4 दिवसांत असा झाला मोठा फायदा

| Updated on: Aug 20, 2024 | 3:59 PM

Saraswati Saree Depot Share Listing : साडी तयार करणारी कंपनी सरस्वती साडी डिपोचा शेअर BSE वर 200 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर आयपीओमध्ये या शेअरची किंमत 160 रुपये प्रति शेअर होता. एका स्टॉकमागे गुंतवणूकदारांना 40 रुपयांचा फायदा झाला.

Multibagger Share : कोल्हापूरच्या साडी तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना लावली लॉटरी; 4 दिवसांत असा झाला मोठा फायदा
या कंपनीने केले मालामाल
Follow us on

साडी तयार करणाऱ्या कंपनीच्या आयपीओने धमाल केली. साडी तयार करणारी कंपनी सरस्वती साडी डिपोचा शेअर BSE वर 200 रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये या शेअरची किंमत 160 रुपये प्रति शेअर होता. एका स्टॉकमागे गुंतवणूकदारांना 40 रुपयांचा फायदा झाला. हा शेअर बाजारात 25 टक्के वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओत दोन लाख रुपये गुंतवले. त्यांना अवघ्या 4 दिवसांत 2.50 लाखांचा परतावा मिळाला. चारच दिवसांत 50 हजारांची लॉटरी लागली.

NSE वर भाव काय?

सरस्वती साडी डेपोचा शेअर एनएसईवर 194 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्याने 21.25 टक्क्यांची भरारी घेतली. 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असणाऱ्या सरस्वती साडी डेपोच्या आयपीओत 14 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीची संधी होती. गुंतवणूकदारांसाठी 90 शेअर अथवा त्या पट्टीत बोली लावण्याची संधी होती. हा इश्यू 14 ऑगस्ट रोजी बंद झाला. आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता लिस्टिंगनंतर गुंतवणूकदार केवळ 4 दिवसातच मालामाल झाले.

हे सुद्धा वाचा

आयपीओला जोरदार प्रतिसाद

सरस्वती साडी डेपोच्या आयपीओला गुंतवणूकदारांना चांगला प्रतिसाद दिला. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये 61.88 टक्क्यांचे सब्सक्रिप्शन केले. तर गैर-संस्थागत गुंतवणूकदारांनी या आयपीओत 358.65 टक्क्यांचे सब्सक्रिप्शन केले. एकूणच या शेअरवर गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास दाखवला.

काय करते ही कंपनी?

या कंपनीचा मुख्य व्यवसाय साडी तयार करण्याचा आहे. याशिवाय ही कंपनी महिलांचे कपडे, ड्रेस मटेरियल, ब्लाऊज पीस आणि कापड तयार करते. या कंपनीचे मु्ख्य कार्यालय कोल्हापूरमध्ये आहे. ही कंपनी 1966 मध्ये स्थापन करण्यात आली होती. सूरत, वाराणशी, महू, मदुराई, धर्मावरम, कोलकत्ता आणि बेंगळुरुसह देशात या कंपनीचे अनेक सहभागीदार आहेत आणि मजबूत वितरण जाळे आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.