पेनी स्टॉकची कमाल अनेकांनी अनुभवली आहे. कमी किंमतीत खरेदी केलेला स्टॉक जेव्हा तुफान घौडदौड करतो. तेव्हा कमाल होते. तुमची गुंतवणूक कित्येक पटीत वाढते. तुम्हाला मोठा फायदा होतो. या कंपनीने गुंतवणूकदारांना अशीच लॉटरी लावली आहे. आता हा पेनी स्टॉक उरला नाही. त्याने मोठी भरारी घेतली आहे. या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे 2 कोटी रुपये केले. ज्यांनी त्यांची गुंतवणूक तशीच ठेवली. त्यांना मोठा फायदा झाला.
या कंपनीने केली कमाल
या शेअरने गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे. श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीने ही कमाल दाखवली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सध्या सातत्याने 2 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागलेले आहे. हा स्टॉक 222.50 रुपयांच्या 52 आठवड्याच्या उच्चांकावर आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने जवळपास 9,000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या दरम्यान हा शेअर 2.50 रुपयांवरुन वाढून 222.50 रुपयांवर पोहचला. शुक्रवारी बाजार बंद झाला, त्यावेळी हा स्टॉक 219.60 रुपयांवर होता.
वर्षभरात 15,000 टक्क्यांचा परतावा
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडचा शेअर सातत्याने दमदार कामगिरी बजावत आहे. त्याने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर गेल्या पाच दिवसात 9 टक्के, तर एका महिन्यात 50 टक्क्यांचा परतावा दिला आहे. वार्षिक आधारावर या शेअरने आतापर्यंत 7,472.41 टक्क्यांची उसळी घेतली आहे.
या दरम्यान या स्टॉकची किंमत 2.90 रुपयांहुन आता 219.60 रुपयांवर पोहचला आहे. एका वर्षात हा शेअर 15,044.83 टक्के उसळला. या दरम्यान या स्टॉकची किंमत 1.45 रुपयांहून थेट 219.60 रुपयांवर पोहचली. एका वर्षात एक लाख रुपये गुंतवणुकीचे या कंपनीने दोन कोटी रुपये केले आहे. म्हणजे एका लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता दोन कोटी रुपये आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यातील उच्चांक 222.50 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 1.26 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 564.55 कोटी रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.