Multibagger Stock : रेल्वेशी संबंधीत कंपनीची कमाल, 3 वर्षांत एक लाखांचे झाले इतके लाख

| Updated on: Sep 09, 2023 | 4:33 PM

Multibagger Stock : रेल्वेशी संबंधित शेअर 20 मार्च 2020 रोजी बीएसईवर 15.17 रुपये होता. आता हा शेअर 734.70 रुपयांवर आहेत. गेल्या तीन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 4,743 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Multibagger Stock : रेल्वेशी संबंधीत कंपनीची कमाल, 3 वर्षांत एक लाखांचे झाले इतके लाख
Follow us on

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : भारतीय रेल्वेचा (Indian Railway) कायापालट सुरु आहे. जलद सेवेवर भर देण्यात येत आहे. अनेक पायाभूत विकास योजना सुरु आहेत. जागतिक स्तराची मॉडेल रेल्वे स्टेशन तयार करण्यात येत आहे. त्यासाठीचे काम सुरु आहे. त्यामुळे रेल्वेशी संबंधित सर्व कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. अशाच एका शेअरने (Share Market) तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीने मार्च 2020 मध्ये आतापर्यंत जवळपास 4500 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे (Investors) वारे-न्यारे झाले आहेत. त्यांना अवघ्या तीन वर्षांतच लॉटरी लागली आहे. शेअर बाजारात अनेक शेअर गुंतवणूकदारांचे नशीब उघडवतात. पण त्यासाठी अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो. योग्य शेअरची निवड केली तर फायदा होतो.

K&R Rail Engineering

केअँडआर रेल्वे इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले. रेल्वेच्या बांधकामाशी ही कंपनी संबंधित आहे. ही कंपनी इंजिनिअरिंग, उत्पादन आणि कमिशनिंग सेक्टर्समध्ये सेवा देते. गुरुवारी या कंपनीच्या शेअरने सर्वकालीन उच्चांकी धाव घेतली. या शेअरने 700 रुपयांचा टप्पा पार केला. शुक्रवारी या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 734.70 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

तीन वर्षांत 4700 टक्क्यांहून अधिकचा परतावा

गुंतवणूकदारांसाठी हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या तीनच वर्षांत या शेअरने ही कमाल केली आहे. केअँडआर रेल इंजिनिअरिंगचा शेअर 20 मार्च 2020 रोजी बीएसईवर 15.17 रुपये होता. आता हा शेअर 734.70 रुपयांवर आहेत. गेल्या तीन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 4,743 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

एक लाखांचे झाले इतके

जर गुंतवणूकदाराने या रेल्वे स्टॉकमध्ये मार्च 2020 मध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर त्यांना मोठा फायदा झाला असता. ही गुंतवणूक आज 4,743 टक्क्यांनी वधारली असती. म्हणजे एक लाख रुपयांचे 46 लाख रुपये झाले असते. या शेअरने एकाच वर्षांत एक लाखाचे 25 लाख केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. एकाच वर्षात या शेअरमध्ये 2529 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर एका महिन्यात या शेअरमध्ये 36 टक्के वाढ झाली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.