नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : अनेकांना माहिती नाही, पण भारतीय लग्नसराई हा जितका आनंदाचा सोहळा आहे, दोन जीवांचे, दोन कुटुंबांची गाठ बांधण्याचे पवित्र कार्य आहे, तेवढेच हा मोठा व्यवसाय पण आहे. आश्चर्य वाटले ना? पण एका अंदाजानुसार लग्नसराईत भारतात गेल्यावर्षी 130 अब्ज डॉलरची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. हा देशातील चौथा मोठा उद्योग आहे. हा उद्योग ऑटो आणि आयटी सेक्टरपेक्षा पण अधिक आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. लग्नसराईला आता इव्हेंटचे स्वरुप येत आहे. हॉटेल, फूड, बेव्हरेजस, ज्वेलरी आणि कपड्यांच्या बाजार गजबजलेला असतो. या काळात शेअर बाजारातून गुंतवणूकदारांना मोठ्या कमाईची संधी आहे.
टायटन कंपनी
टाटा समूहाच्या टायटन कंपनीचा स्टॉक कमाई करुन देऊ शकतो. कंपनीचा ज्वेलरी विभाग 90 टक्के महसूल मिळवून देतो. ही कंपनी तनिष्क, जोया, मिया आणि कॅरेटलेन या माध्यमातून आभूषणे, दागिन्यांची विक्री करते. या कंपनीच्या मनगटी घड्याळींची विक्री जोरात होते. त्यांची मागणी अधिक आहे.
इंडियन हॉटेलचा शेअर
गेल्या काही वर्षांत हॉटेल इंडस्ट्रीचा महसूल वाढला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. या अंतर्गत ताज हॉटेलला ब्रँड फायनान्स या संस्थेनुसार, 2022 मध्ये जगातील हॉटेल व्यवसायात भारतीय हॉटेल क्षेत्राचे जोरदार योगदान दिसून आले. या क्षेत्राने मोठी मुसंडी मारली आहे. कोविडनंतर हे क्षेत्र तेजीत आहे.
वेदांत फॅशन
वेदांत फॅशनच्या पोर्टफोलिओत मान्यवर, मोहे आणि मंथन असे ब्रँड आहेत. या ब्रँडने बाजारात चांगली मांड ठोकली आहे. या कंपनीने अनेक शहरात फ्रँचाईज दिल्या आहेत. त्यामुळे अगदी निम्न शहरात सुद्धा हा ब्रँड दिसून येतो. लग्नसराईत या ब्रँडच्या कपड्यांची मोठी मागणी आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.