नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखिमेची मानल्या जाते. तर काही स्टॉक्स गुंतवणूकदारांचे नशीब उघडतात. गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न मिळतो. हे स्टॉक एखाद्या लॉटरीसारखे असतात. ते गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर खरे उतरतात. दिग्गज कंपन्यांसारखीच या कंपन्या पण कमाई करुन देतात. गुरुवारी बाजारात तेजीचे सत्र आले. मुंबई निर्देशांकासह निफ्टीने पण चांगली कामगिरी बजावली. बीएसईवर गुरुवारी दुपारी 465 अंक आणि निफ्टी 129 अंकांच्या तेजीसह ट्रेड करत होता. काही दिवसांच्या पडझडची सत्रावर हा एक प्रकारे उताराच म्हणता येईल. हा मल्टिबॅगर शेअर या तेजीच्या सत्रात चमकला आहे.
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेड
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेडच्या शेअरने गेल्या एका वर्षांत मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. कंपनीचा शेअर 16 नोव्हेंबर 2022 रोजी 24.35 रुपयांवर होता. या 16 नोव्हेंबर 2023 रोजी तो 608 रुपयांवर पोहचला आहे. एकाच वर्षात या कंपनीने गुंतणूकदारांना 2,200% परतावा दिला. एकाच वर्षात या कंपनीतील एक लाख रुपयांची गुंतवणूक 23 लाख रुपयांच्या घरात पोहचली.
तिमाही निकालात पण अग्रेसर
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेड कंपनीने 30 सप्टेंबर, 2023 रोजी (H1FY24) सहामाही निकालांची माहिती दिली. त्यानुसार H1FY24 साठी कंपनीचा महसूल 26.11 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर (YoY) त्यामध्ये 246.38 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा ऑपरेशन्स नफा 9.71 कोटी रुपये होता. तर कंपनीचा PAT 8.05 कोटी रुपये होता. यापूर्वीच्या समान सहामाहीत तो 0.07 कोटी रुपये होता.
काय करते कंपनी
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेड प्रामुख्याने एनर्जी सोल्यूशन्ससाठी मदत करते. कंपनी स्टीम कुकिंग आणि इतर औद्योगिक गरजांसाठी लागणाऱ्या स्टीम उत्पादनासाठी सोलर पॅराबॉलिक कंसंट्रेटिंग सिस्टमची निर्मिती करते. कंपनीचे अनेक ग्राहक आहेत. कंपनीकडे उत्पादनाविषयीची ऑर्डर नोंदविण्यात येते.
स्टॉकची दिशा काय
आज कंपनीचा स्टॉक 608.25 रुपयांवर उघडला. हा 608.25 रुपयांच्या उच्चांकावर आणि 591.05 रुपयांच्या निच्चांकावर पोहचला आहे. हा शेअर सध्या 5% वाढीसह 608.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 52-आठवड्यातील उच्चांक 719.00 रुपये तर 52-आठवड्यातील निच्चांक 23.15 रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.