Multibagger Stock | या शेअरची तुफान बॅटिंग, गुंतवणूकदारांना केले मालामाल

| Updated on: Oct 15, 2023 | 4:49 PM

Multibagger Stock | या केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. अवघ्या काही वर्षांतच त्यांचे नशीब चमकले. त्यांना मोठी कमाई करता आली. त्यामुळेच हा शेअर आता मल्टिबॅगर म्हणून ओळखल्या जात आहे. ही कंपनी 1970 साली स्थापन झाली आहे. तिचे बाजारातील भांडवल 28,420 कोटी रुपये आहे. कंपनीने मोठा नफा कमावला आहे.

Multibagger Stock | या शेअरची तुफान बॅटिंग, गुंतवणूकदारांना केले मालामाल
Follow us on

नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारातील या कंपनीने पुन्हा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. अनेकांना तर इच्छित लक्ष्य गाठता आल्याने ते या कंपनीवर खूश आहेत. ही केमिकल उत्पादक कंपनी 1970 साली स्थापन झाली. तिचे सध्याचे बाजारातील भांडवल 28,420 कोटी रुपयांच्या घरात आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी वधारला. शेअरच्या तुफान बॅटिंगमुळे गुंतवणूकदारांना 6.5 लाखांपर्यंत कमाई करता आली. शेअर बाजारात हा मल्टिबॅगर शेअर ठरला आहे. एका वर्षात शेअर जवळपास 8 टक्के घसरला आहे. या शेअरचा 52- आठवड्यातील उच्चांक 2,372.70 रुपये आहे.

कोणती आहे ही कंपनी

दीपक नायट्रेट अशी ही कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय बडोद्याला आहे. ही एक केमिकल उत्पादक कंपनी आहे. अनेक राज्यात केमिकल उत्पादनाचे प्रकल्प कार्यरत आहे. कंपनीचा मुख्य प्रकल्प गुजरातमधील दहेज येथे आहे. महाराष्ट्रात रोहा आणि तळोदा तर तेलंगाणा राज्यात हैदराबाद येथे मुख्य उत्पादक प्रकल्प आहे. ही कंपनी 1970 मध्ये अस्तित्वात आली. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 8,019 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. या कंपनीचे मार्केट कॅप 28,420 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या कामगिरी सुस्तावली

शुक्रवारी दीपक नायट्रेट कंपनीचा शेअर 0.23 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 2,083 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत या कंपनीचा शेअर जवळपास स्थिर राहिला. गेल्या एका महिन्यात या कंपनीचा शेअर 7 टक्क्यांनी घसरला. तर 6 महिन्याच्या आधारे शेअरमध्ये 12 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी आली आहे. एका वर्षात शेअर जवळपास 8 टक्के घसरला आहे. या शेअरचा 52- आठवड्यातील उच्चांक 2,372.70 रुपये आहे.

दीर्घकाळात मोठी संधी

या केमिकल शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत मर्यादीत घाडमोड झाली आहे. पण त्यापूर्वी भावात मोठी तेजी दिसून आली. गेल्या 5 वर्षात या शेअरचा भाव 730 टक्क्यांनी चढला. तर 10 वर्षांत 6,500 टक्क्यांची तेजी दिसून आली. 10 वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांनी दीपक नायट्रेटमध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती तर त्याचे मूल्य 6.5 लाख झाले असते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.