Multibagger Stock | 1 रुपयांचा स्टॉक एकदम सूसाट! 1 लाखांचे केले 3 कोटी केवळ पाच वर्षांत

| Updated on: Feb 18, 2024 | 3:07 PM

Multibagger Stock | बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडने गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. एक लाखांचे या कंपनीने तीन कोटी रुपये केले आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट केला तर गेल्या पाच वर्षांत या शेअरने 33,670 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला.

Multibagger Stock | 1 रुपयांचा स्टॉक एकदम सूसाट! 1 लाखांचे केले 3 कोटी केवळ पाच वर्षांत
Follow us on

नवी दिल्ली | 18 February 2024 : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमेची मानण्यात येते. पण बाजारातील एखादा शेअर मल्टिबॅगर ठरतोच. अगदी सुरुवातीला ज्यांनी असा शेअर खरेदी केला. त्यांचे नशीब एकदम उघडते. काही शेअर दीर्घकालीन फायदा मिळवून देतात तर काही शेअर अवघ्या काही दिवसांत मालामाल करतात. अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षात लॉटरी लावली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या (Hazoor Multi Projects Share) शेअने एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, शेअरधारकांना 3 कोटींचा परतावा दिला.

5 वर्षांत 33,670 टक्क्यांचा परतावा

केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या क्षेत्रात कायापालट दिसत आहे. तर या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांचा महसूल आणि नफ्यात पण वाढ होत आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीने गुंतवणूकदारांना असाच झटपट परतावा दिला आहे. पाच वर्षातच त्यांना लॉटरी लागली.

हे सुद्धा वाचा

स्टॉक 1 रुपयांहून 381 रुपयांवर

  1. Hazoor Multi Project च्या शेअरने मोठी झेप घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरने दमदार कामगिरी बजावली. हा शेअर सूसाट धावला. हा शेअर 1 रुपयांवरुन आता 381 रुपयांवर पोहचला आहे. 22 फेब्रुवारी 2019 रोजी हा शेअर अवघ्या 1.13 रुपयांवर होता. तर 2021 मध्ये या शेअरची गती मंदावली. या शेअरने पुन्हा रॉकेट भरारी घेतली. गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची उसळी आली. हा शेअर 381.60 रुपयांवर पोहचला.
  2. पाच वर्षांचा विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. एका शेअरची किंमत 2019 ते 2024 या दरम्यान 380.47 रुपयांपर्यंत पोहचला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता ही रक्कम 3.3 कोटी रुपये इतकी झाली असती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.