नवी दिल्ली | 17 March 2024 : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी जोरदार परतावा दिला. या स्टॉकची किंमत पण कमी आहे. हे पेन्नी शेअर आहेत. कमी कालावधीत या शेअरने मोठा परतावा दिला. या सरकारी स्टॉकने पण असाच इतिहास रचला आहे. त्याने गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. पाच वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 1,150% परतावा दिला आहे. या कंपनीला नुकतीच 106 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या मल्टिबॅगर स्टॉकचा आयपीओ पाच वर्षांपूर्वी येऊन गेला.
RVNL ची कमाल
रेल विकास निगम लिमिटेडचा (RVNL) IPO पाच वर्षांपूर्वी आला होता. IPO मार्च 2019 मध्ये 17 ते 19 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बँडवर बाजारात दाखल झाला होता. RVNL चा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर त्याने मोठी कमाल दाखवली नाही. पण त्यानंतर या शेअरने मोठी मजल मारली. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. ज्या गुंतवणूकदारांनी त्यावेळची गुंतवणूक कायम ठेवली. त्यांना मोठा फायदा झाला. आता या शेअरने 246 रुपयांच पल्ला गाठला आहे. ज्या तेजीने या शेअरची घौडदौड सुरु आहे, ते पाहता हा शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांचा झाला मोठा फायदा
या शेअरमुळे तगडी कमाई
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी RVNL मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला फटका बसला असता. ही रक्कम 97,500 रुपयांपर्यंत खाली आली असती. तर या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये गुंतवणूक केली असती तर एक लाखांचे आज 1.35 लाख रुपये झाले असते. सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 1.50 लाख रुपये झाली असती.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.