नवी दिल्ली : शेअर बाजारात, गुंतवणूकदारांचे झटक्यात नशिब उघडविणारे अनेक स्टॉक आहेत. या शेअर्सनी एकाच महिन्यात 100 टक्के परतावा दिला आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे. विशेष म्हणजे यातील कमाई करुन देणारे स्टॉक फारसे चर्चेत नसतात. यातील काही स्टॉक कर्जमुक्त आहेत. पण या कंपन्या हुडकून काढून त्यात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या मल्टिबॅगर स्टॉकची (Multibagger Stock) सध्या चर्चा रंगली आहे. औरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेडने (Aurionpro Solutions) आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जोरदार परतावा दिला आहे. हा स्टॉक तीनच वर्षात गगनाला भिडला आहे.
असा वाढला महसूल
औरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड ही एक आयटी फर्म आहे. 2005 मध्ये या कंपनीचा महसूल 100 दशलक्ष रुपये होता. 2023 मध्ये तो 6,590 दशलक्ष रुपयांवर पोहचला. या कंपनीने यशाचा रस्ता तयार केला आहे. मालाबार इंडियाने या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. 14 जून रोजी 880.23 रुपये प्रति शेअर्स दराने या टेक कंपनीचे 2.63 लाख शेअर खरेदी केले. मालाबार इंडियाने या आयटी फर्ममध्ये 1.15 टक्के वाटा नोंदवला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार इंडस व्हॅलीची होल्डिंग पीटीई लिमिटेडने या कंपनीत दोन लाख शेअर खरेदी केले आहेत.
तीन वर्षात रॉकेट भरारी
Aurionpro Solutions च्या स्टॉकमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये 1,439 टक्क्यांहून वाढ झाली आहे. हा मल्टिबॅगर स्टॉक 2020 मध्ये 56 रुपयांवर होता. 15 जून 2023 रोजी हा स्टॉक बीएसईवर 1005.15 रुपयांवर पोहचला. म्हणजे तीनच वर्षांत या स्टॉकने गगन भरारी घेतली. एक लाखाची गुंतवणूक या तीन वर्षांत आज 17.94 लाख रुपये झाली. त्या तुलनेत निर्देशांक 90 टक्के वधारला आहे.
टेक्निकल चार्ट काय सांगतो
शुक्रवारी औरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर 2.08 टक्क्यांनी वधारला. हा स्टॉक 1,022.00 रुपयांवर बंद झाला. टेक्निकल चार्टनुसार, औरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्समध्ये 85 वर होता. म्हणजे तो ओव्हरबॉट झोनमध्ये व्यापार करत आहे. या शेअरचा बीटा 1.4 आहे. त्यामुळे शेअरमध्ये अस्थिरता स्पष्टपणे दिसते. हा शेअर 5, 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजपेक्षा अधिक व्यापार करत आहे.
काय करते ही कंपनी
औरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत काम करणारी कंपनी आहे. ही बँकिंग, मोबॅलिटी, पेमेंट आणि सरकारी क्षेत्रातील काम करते. मार्च 2023 च्या तिमाहीत या फर्मने गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 18.97 कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत यावेळी 32.21 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.