नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) चढउताराचे सत्र सुरुच आहे. बाजाराने मध्यंतरी उच्चांक गाठला होता. अशा काळात काही स्टॉकने गुंतवणूकदारांना भरभरुन दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. त्यांचे नशीब पालटले. त्यांना झटपट परतावा मिळाला. अशा शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना आता जोरदार परतावा मिळाला आहे. 22 वर्षांपूर्वी अथवा मध्यंतरी गुंतवणूकदारांनी या छोट्या बँकेचा स्टॉक खरेदी केला असता तर आज त्यांना मोठा फायदा झाला असता. सिटी युनियन बँकेच्या शेअरने (City Union Bank Stock) दीर्घकालीन गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. 1 रुपयांचा हा शेअर आता इतक्या रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे या शेअरवर लखपती करोडपती झाले आहेत. असा दिला या शेअरने मोठा रिटर्न
असे झाले असते करोडपती
सिटी युनियन बँकेच्या शेअरमध्ये सध्या घसरणीचे सत्र सुरु आहे. पण दीर्घकालीन गुंतवणुकीत या शेअरने चांगला परतावा दिला आहे. या बँकिंग स्टॉकने 1 रुपयांपासून सुरुवात केली. आज हा शेअर 121 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 11,821 टक्के रिटर्न दिला. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक केवळ 1.02 रुपये होता. त्यावेळी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असता तर गुंतवणूकदार कोट्याधीश झाला असता. या स्टॉकचा 52 आठवड्यातील उच्चांक 205 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 119.50 रुपये आहे.
कंपनीच्या शेअरची कामगिरी
या कंपनीच्या शेअरने जोरदार कामगिरी केली आहे. लाँग टर्म गुंतवणूकदारांचे नशीब चमकावले आहे. 1999 साली हा शेअर केवळ 1 रुपयांना मिळत होता. या शेअरला जानेवारी महिन्यात 2009 रुपयांपर्यंत मोठी झेप घेता आली नाही. हा शेअर 8 रुपयांवर होता. पण त्यानंतर या शेअरने जोरदार मुसंडी मारली. पुढील वर्षी तो 10 रुपये आणि नंतर 18 रुपयांवर पोहचला.
2015 पासून रॉकेट स्पीड
2015 पासून हा शेअर रॉकेटच्या गतीने धावला. हा शेअर थेट 78 रुपयांवर पोहचला. तीन वर्षानंतर हा शेअर 5 जानेवारी 2018 रोजी 160 रुपयांवर पोहचला. सिटी युनियन बँकेच्या शेअरची रॉकेट भरारी काही थांबली नाही. 4 जानेवारी 2019 रोजी हा शेअर 195 रुपयांवर पोहचला. 24 जानेवारी 2020रोजी हा शेअर 237 रुपयांवर पोहचला. या दोन वर्षांत या शेअरमध्ये मोठे-चढउतार दिसून आले. गेल्या एका वर्षांत या शेअरने 31 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.