Multibagger Stocks : एफडी, आरडी नाही तर या बँकेच्या शेअरने केले मालामाल, असा झाला डबल फायदा

| Updated on: Aug 10, 2023 | 6:55 PM

Multibagger Stocks : भारतात अजूनही अनेक गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा बँकेच्या बचत खात्यात, आरडी, एफडीमध्ये गुंतवावा वाटतो. पण या ठिकाणी मोठा परतावा मिळत नाही. पण या बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब पलटवले.

Multibagger Stocks : एफडी, आरडी नाही तर या बँकेच्या शेअरने केले मालामाल, असा झाला डबल फायदा
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : भारतात अजूनही अनेक गुंतवणूकदार बचत आणि गुंतवणुकीसाठी बँकेत जातात. बचत खाते आणि मुदत ठेव योजनेचा (Saving Account And Fixed Deposit) पर्याय त्यांना महत्वाचा वाटतो. पण त्यांना त्यावर मोठा परतावा मिळत नाही. पण हाच पैसा बँकेच्या शेअरमध्ये गुंतवल्यास जोरदार परतावा मिळू शकतो. या बँकेने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी हा शेअर डबल (Share Double Return) होत आहे. ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली. त्यांना मोठा फायदा झाला. एफडी आणि आरडीपेक्षा या शेअरने कितीतरी पटीने अधिक रिटर्न दिले. ज्यांनी या बँकेच्या एफडीत गुंतवणूक केली, त्यांच्यापेक्षा या बँकेच्या शेअरने अधिक परतावा दिला आहे. या बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांचे नशीबच पालटले आहे.

सुरक्षित परताव्यासाठी गुंतवणूक

पारंपारिक गुंतवणूकदार आजही एफडीत, आरडीत, सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतात. त्यांना ही गुंतवणूक एकतर सुरक्षित वाटते आणि दुसरं म्हणजे सरकारी बँका अथवा टपाल खात्यात गुंतवणूक (Post Office Investment) केल्यास पैसा बुडण्याचा धोका नसतो. पण सोनं वगळता इतर माध्यमात केलेल्या गुंतवणुकीवर परतावा अत्यंत कमी मिळतो. शेअर बाजारात अनेक स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी लागते. पण काही स्टॉक एकदम मालामाल करतात. या स्टॉकने एकाच महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले. तुम्ही हीच गुंतवणूक बँकेच्या एफडीत (Bank FD) केली असती तर तुम्हाला 10 वर्षे वाट पाहावी लागली असती.

हे सुद्धा वाचा

या शेअरची जोरदार कामगिरी

हा शेअर इंडियन बँकेचा आहे. इंडियन बँकेचा शेअर आज 0.52 टक्क्यांच्या नुकसानीसह 381 रुपयांवर बंद झाला. गेल्या 5 दिवसांच्या भावाने जवळपास 12 टक्क्यांची तेजी आली. गेल्या एका महिन्यात इंडियन बँकेचा शेअरचा भाव 23 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या 6 महिन्यात हा शेअर जवळपास 35 टक्के मजबूत झाला आहे.

वर्षभरात डबल पैसा

इंडियन बँकेचा शेअर एका वर्षात मल्टिबॅगर ठरला. गेल्या एका वर्षात इंडियन बँकेच्या शेअरचा परतावा जवळपास 110 टक्के राहिला. या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात डबल रिटर्न मिळाले. 3 वर्षांत या शेअरने 6 पटीहून अधिक रिटर्न दिला. एफडीमध्ये त्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्षे लागले असते, तेव्हा ही रक्कम दुप्पट झाली असती.

जोखीम घ्याल तर कमाई

एफडी वा इक्विटी, हा गुंतवणूकदारांचा विषय आहे. त्यांना कुठे गुंतवणूक करायची हा त्यांचा विषय आहे. पर्याय कोणता निवडावा ही त्यांची पसंती आहे. गुंतवणूकदार पसंत, त्यांचे उद्दिष्ट, जोखीम घेण्याची क्षमता या आधारे गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतात.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.