शेअर बाजारात या कंपनीने हनुमान उडी घेतली आहे. स्मॉल कॅप कंपनीने एकाच वर्षांत गुंतवणूकदारांना लखपती, करोडपती केले. या कंपनीने नुकताच आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीतील आणि पूर्ण वर्षाचा लेखाजोखा मांडल. ही एक स्टील कंपनी आहे. ही कंपनी डीआय पाईप तयार करणे आणि स्पेशल ग्रेड फेरो अलॉय सारखे उत्पादनं तयार करते. 53 रुपयांवरुन 1,085 रुपयांची भरारी या कंपनीने घेतली आहे.
जबरदस्त घौडदौड
जय बालाजी इंडस्ट्रीज (Jai Balaji Industries) कंपनीने 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात 1421टक्क्यांची गरुड झेप घेतली आहे. या कंपनीला आर्थिक वर्षात 879.57 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. जय बालाजी कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6,413.78 कोटी रुपयांची सर्वाधिक विक्रीचा विक्रम पण नावे केला आहे. विक्रीचा हा आकडा वार्षिक आधारावर 4.71 टक्के अधिक आहे.
तिमाही आधारावर कसा राहिला नफा
तिमाही कामगिरीवर नजर टाकता, या कंपनीला आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात 272.98 कोटींचा निव्वळ नफा मिळाला. तर गेल्या वर्षात समान तिमाहीत कंपनीला 13.08 कोटींचा तोटा झाला होता. या तिमाहीत वार्षिक आधारावर विक्रीत 7.05 टक्क्यांची वाढ झाली. विक्रीचा आकडा 1,845.60 कोटी रुपयांवर पोहचला. कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक आदित्य जाजोदिया यांनी सांगितले की, कंपनीने 1,121 कोटींचा जबरदस्त EBITDA मिळवला आहे.
1 वर्षापूर्वी 53 रुपये भाव
जय बालाजी कंपनीचा शेअर 25 एप्रिल 2023 रोजी 53.03 रुपये प्रति शेअर असा होता. आता हा शेअर 1,085 रुपयांवर पोहचला आहे. एका वर्षात या स्टॉकने जवळपास 1900 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. शुक्रवारी कंपनीच्या स्टॉकमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या महिनाभरात या शेअरने 16.89 टक्क्यांचा परतावा दिला. याशिवाय सहा महिन्यात या शेअरने 87.21 टक्क्यांची चढाई केली. एका वर्षात कंपनीचे मार्केट कॅप 771.32 कोटी रुपयांहून 18,744.48 कोटी रुपयांवर पोहचले.
1 लाखांचे किती?
एक वर्षापूर्वी या शेअर ची किंमत 53 रुपये होती. त्यावेळी गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची गुंतवणूक या शेअरमध्ये केली असती तर आज ते 20 लाख रुपये झाले असते. सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर 1.89 लाख रुपये मूल्य असते. पाच वर्षांपूर्वी या शेअरने 3,634.94 टक्के रिटर्न दिला आहे. म्हणजे एका लाख रुपयांचे आज 38 लाख रुपये झाले असते.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.