Mumbai : सीएनजी, पीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून कमी होणार; जाणून घ्या नवे दर

| Updated on: Aug 17, 2022 | 6:52 PM

त्यामुळे सीएनजी गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Mumbai : सीएनजी, पीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून कमी होणार; जाणून घ्या नवे दर
सीएनजी, पीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून कमी होणार; जाणून घ्या नवे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) आज मध्यरात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमत प्रति किलो 6 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) ची किंमत 4 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे सीएनजीच्या सर्व करांसह सुधारित किंमत 80 रुपये प्रति किलो असेल, आणि पीएनजी गॅसची किंमत 48.50 रुपये प्रति युनिट असेल. त्यामुळे सीएनजी गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सीएनजी सहा रुपयांनी स्वस्त झाला

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या वाटपातील वाढीव सुधारणेच्या परिणामी, महानगर गॅस लिमिटेड (MGL) त्याच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किंमतीत रु. 6.00 आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसच्या किमती कमी केल्या आहेत. 16 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री 17 ऑगस्ट 2022 च्या सकाळपासून मुंबईत आणि आसपासच्या परिसरात दर लागू होईल. त्यानुसार, CNG च्या सर्व करांसह सुधारित किंमत 80 रुपये किलो आणि देशांतर्गत पीएनजी किंमत 48.50 मुंबई आणि आसपासच्या शहरात असेल,” असे महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केले आहे.

एप्रिल महिन्यापासूनची ही सहावी दरवाढ होती

या महिन्याच्या सुरुवातीला, शहर गॅस वितरकाने सीएनजीसाठी प्रति किलोग्रॅम 6 रुपये आणि पाइप्ड नैसर्गिक वायूसाठी प्रति युनिट 4 रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. एप्रिल महिन्यापासूनची ही सहावी दरवाढ होती. उद्यापासून घरगुती आणि सीएनजीचा दर कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

सरकारने हे पाऊल उचलले

यापूर्वी, सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी उद्योगांकडून काही प्रमाणात नैसर्गिक वायूचे वाटप शहर गॅस वितरण कंपन्यांना केले होते. दिल्लीच्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) आणि मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) साठी वाटप प्रतिदिन 1.75 कोटी घनमीटरवरून 2.078 दशलक्ष घनमीटर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.