मुंबई : गेल्या पाच वर्षात मुंबईकरांच्या कौटुंबीक उत्पन्नात वाढ झाली आहे. मुंबईने कौटुंबीक उत्पन्नाच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. नाइट फ्रँक जागतिक अहवालाच्या अर्बन फ्युचर्स या उद्घाटनाच्या अंकात ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई शहराने गेल्या पाच वर्षांच्या काळात (2014-18) सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. अभ्यासाच्या कालावधीत मुंबईने वार्षिक कौटुंबिक उत्पन्नामध्ये 20.4 टक्के वाढ साध्य केली आहे. याच कालावधीत मुंबईतील घराच्या किमती मात्र केवळ 8 टक्के दराने वाढल्या आहेत. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराने या पाच वर्षांच्या काळात सर्वाधिक वार्षिक उत्पन्नवाढ 25 टक्के दराने साध्य केली आहे, तर 2014-18 या कालावधीत घरांच्या किमतीतील सर्वाधिक अर्थात 63.6 टक्के वाढ अॅम्सटरडॅम शहरात (नेदरलॅण्ड्स) झाली आहे.
घरांच्या किमती आणि उत्पन्न यांतील तफावत समजून घेण्यासाठी या अहवालात जगभरातील 32 शहरांचे मूल्यांकन करण्यात आले असून, त्यानुसार ही तफावत 2018 मध्ये 740 अब्ज डॉलर्स होती.
क्रमवारी | शहर | घरांच्या किमतीतील वाढ (%) | उत्पन्नातील वाढ (%) |
1 | सॅनफ्रान्सिस्को | 41.8 | 25.6 |
2 | मॉस्को | 0.1 | 22.7 |
3 | मुंबई | 8 | 20.4 |
4 | लॉस एंजेलिस | 25.5 | 15.4 |
5 | सिंगापोर | -2.8 | 14.9 |
6 | ऑकलंड | 47 | 14.7 |
7 | क्वालालंपूर | 21.8 | 13.2 |
8 | ड्युब्लिन | 61.9 | 13.2 |
9 | बँकॉक | 33.3 | 12.2 |
10 | व्हँकुअर | 57.6 | 12 |
भारतातील सर्वांत महागडी रिअल इस्टेट बाजारपेठ असूनही मुंबईने जागतिक स्तरावरील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. मुंबईमध्ये वास्तव कौटुंबिक उत्पन्नाच्या वाढीने घरांच्या किमतीतील वाढीला 12.4 टक्क्यांनी पिछाडीवर टाकले आहे. याचा अर्थ शहर अधिक परवडण्याजोगे झाले आहे. उत्पन्नवाढीच्या तुलनेत घरांच्या प्रत्यक्ष किमती बऱ्याच संथगतीने म्हणजेच 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
वास्तव, खर्चण्याजोग्या कौटुंबिक उत्पन्नामध्ये 2018 सालापर्यंतच्या पाच वर्षांमध्ये 20.4 टक्के वाढ झाली आहे. कमी आकारमानांच्या घरांच्या किमती अधिक स्थिर राहिल्याचे दिसत असल्याने शहर अधिक परवडण्याजोगे झाले आहे. अपार्टमेंटच्या आकारमानामध्ये सातत्यपूर्ण घट होत असल्याने मुंबईत प्रवेशाचा सरासरी खर्च कमी झाला आहे. 2014 ते 2018 या काळात नव्याने बांधण्यात आलेल्या घरांचे आकारमान 25 टक्क्यांनी कमी आहे, असा अंदाज आहे. बहुतेक नवीन गृहप्रकल्प, विशेषत: गेल्या दोन वर्षातील (2017 आणि 2018) परवडण्याजोग्या व मध्यम श्रेणीतील आहेत. त्यांच्या किमती सहसा 75 लाख रुपयांहून अधिक नाहीत.
अहवालातील ठळक निष्कर्ष:
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल म्हणाले, “जगातील अनेक शहरांप्रमाणेच मुंबईतही दरवर्षी नवीन स्थलांतरितांची भर पडत राहते आणि हे शहर घर शोधण्यासाठी कठीण होत जाते. मात्र, भारतातील सर्वांत महागडी रिअल इस्टेट बाजारपेठ असूनही जगातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबई अधिक परवडण्याजोगे शहर आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे, कारण, यातून शहरामध्ये जागतिक तसेच भारतीय संस्थांच्या वाढीची शक्यता दिसून येत आहे. या संस्था मोक्याच्या पण परवडण्याजोग्या ठिकाणांच्या शोधात नेहमीच असतात. मुंबईच्या आर्थिक वाढीच्या आधारावर येथील सरासरी उत्पन्नामध्येही स्थिर वाढ होत आहे, दुसकीकडे मालमत्तेचे दर कमी होत आहेत, अशा रितीने शहर राहण्यासाठी अधिक परवडण्याजोगे झाले आहे”.
नाइट फ्रँक ग्लोबल अफोर्डिबिलिटी मॉनिटर:
सर्वांत महागडी शहरे | त्याखालोखाल महागडी शहरे |
● अॅम्स्टरडॅम
● ऑकलंड ● हाँगकाँग ● लॉस एंजेलिस ● सॅन फ्रान्सिस्को ● सिडनी ● टोरोंटो ● व्हँकुव्हर |
● बँकॉक
● बर्लिन ● डब्लिन ● लंडन ● मेलबर्न ● न्यूयॉर्क ● सिंगापोर ● तोकयो |
तुलनेने परवडण्याजोगी शहरे | सर्वांत परवडण्याजोगी शहरे |
● ब्रुसेल्स
● केप टाउन ● माद्रिद ● मियामी ● मॉस्को ● मुंबई ● पॅरिस ● स्टॉकहोम |
● दुबई
● इस्तंबूल ● जकार्ता ● क्वालालंपूर ● लिस्बन ● मनिला ● रोम ● साओ पावलो |