बिहारच्या कन्येची सर्वात महागडी डील, मुंबईत घेतला इतक्या कोटीचा फ्लॅट; शाहरुखला टक्कर; मन्नतपेक्षा…

| Updated on: Dec 23, 2024 | 3:55 PM

देशात मुंबई हे शहर सर्वात महागड्या प्रॉपर्टीसाठी ओळखलं जातं. मुंबईत 3-4 कोटीत फ्लॅट विकल्या गेल्याचंही आपण नेहमी ऐकत असतो. याच शहरात महागडा हिऱ्याचा हारही विकल्याची बातमी आपण ऐकतो. आता मुंबईतील वरळी येथील एका आलिशान फ्लॅटची विक्री झाल्याचं वृत्त आलंय. ही फ्लॅट विक्री म्हणजे सर्वात मोठी डील असल्याचंही सांगितलं जात आहे.

बिहारच्या कन्येची सर्वात महागडी डील, मुंबईत घेतला इतक्या कोटीचा फ्लॅट; शाहरुखला टक्कर; मन्नतपेक्षा...
कोण आहेत सीमा सिंग ?
Follow us on

मुंबईतील अनेक अपार्टमेंट कोट्यवधीचे आहेत. त्यामुळेच रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी डील होत असते. या महागड्या डील्सबाबत आपण नेहमी ऐकत असतो. सध्याही मुंबईत एक हायप्रोफाईल डील झाली आहे. त्यामुळे नागरिकांचं लक्ष या डील्सकडे लागलं आहे. एल्केम लॅबोरेटरीजच्या प्रमोटर कुटुंबातील सून सीमा सिंह यांनी ही मोठी डील केली आहे. सीमा यांनी मुंबईतील पॉश वस्ती असलेल्या वरळीत 185 कोटी रुपयांचा आलिशान सी-व्ह्यू अपार्टमेंट खरेदी केला आहे. कोण आहेत या सीमा सिंह?

सीमा सिंह कोण?

सीमा सिंह या एल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडच्या प्रमोटरच्या सून आहेत. एल्केम लॅबोरटरीज ही एक भारतीय मल्टिनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी आहे. 1973मध्ये संप्रदा सिंह आणि वासुदेव नारायण सिंह यांनी 1973मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. सीमा सिंह या मृत्यूंजय सिंह यांच्या पत्नी आहेत. त्या एल्केम सिंह कुटुंबातील दुसऱ्या पिढीच्या सदस्या आहेत. संप्रदा सिंह आणि वासूदेव नारायण सिंह मूळचे बिहारच्या जहानाबादचे आहेत. सीमा या सुद्धा बिहारच्या आहेत. त्यांनी नुकतेच मुंबईत आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यापेक्षा या अपार्टमेंटची किंमत फक्त 15 कोटीने कमी आहे.

प्रोजेक्ट डेव्हल्पर कोण?

वरळीत सी फेसजवळ एक सुपर प्रीमियम रेजिडेंशियल टॉवर बनला आहे. लोढा सी फेस असंही त्याचं नाव आहे. याच प्रकल्पात सीमा सिंह यांनी 185 कोटी रुपयांचा एक आलिशान सी-व्ह्यू अपार्टमेंट खरेदी केला आहे. मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा लग्झरी अपार्टमेंटची डील म्हणूनही या डीलकडे पाहिलं जात आहे. सीमा यांनी हे आपार्टमेंट प्रोजेक्ट डेव्हल्पर मॅक्रोटेक डेव्हल्पर्सकडून थेट खरेदी केलं आहे. या डीलमध्ये त्यांना 9 कार पार्किंस स्लॉटही मिळणार आहेत.

स्टॅम्प ड्युटी किती भरली?

सीमा सिंह यांनी नुकतीच कंपनीतील त्यांची 0.3 टक्के भागिदारीच्या 3.58 लाखाहून अधिक शेअर विकले आहेत. त्यातून त्यांना 177 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात आणखी काही रक्कम टाकून त्यांनी हे अपार्टमेंट खरेदी केली आहे. गेल्याच आठवड्यात या अपार्टमेंटची रजिस्ट्री करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी 9.25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही त्यांनी भरली आहे. याबाबतचं वृत्त एका वृत्तपत्राने दिलं आहे.

सीमा यांनी जे अपार्टमेंट खरेदी केलं आहे, ते या टॉवरच्या 30व्या मजल्यावर आहे. त्याचं क्षेत्रफळ 14 हजार वर्ग फूट आहे. या अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं. लोढा सी फेस हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरापैकी एक आहे. या परिसरात अनेक मोठे टॉवर्स असून या ठिकाणी उद्योगपतींसह अनेक नामवंत लोक राहतात.

महिलांना सूट

महाराष्ट्र सरकारने 2021मध्ये महिला होमबायर्ससाठी स्टॅम्प ड्युटीत 1 टक्क्याची सवलत देण्याची घोषणा केली होती. या योजनेमुळे एखाद्या महिला होमबायरला मुंबईत घराचं रजिस्ट्रेशन करताना 5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. या योजनेचा लाभ घेऊन सीमा सिंह यांनी 9.25 टक्के स्टॅम्प ड्युटी भरली आहे.