शेअर बाजारापेक्षा कमी जोखमीचा म्हणून अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. त्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (Mutual Fund SIPs) हा गुंतवणुकीचा एकदम सरळ आणि सोपा मार्ग मानण्यात येतो. अनेकदा डोळे झाकून काही जण कोणत्याही म्युच्युअल फंडची निवड करतात आणि त्यात रक्कम गुंतवतात. म्युच्युअल फंडमध्ये पैसा ओतला म्हणजे आपल्याला खोऱ्याने पैसे ओढता येतील असा काहींचा गैरसमज आहे. प्रत्येकवेळीच म्युच्युअल फंड तुम्हाला फायद्याचे गणित जमवून देतील, असे होत नाही.
या म्युच्युअल फंड्सने वाढवली चिंता
द इकोनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, वर्ष 2024 मध्ये 425 इक्विटी म्यूचुअल फंड्समधून 34 फंड्सने गुंतवणूकदारांचा तोटा केला. त्यांना निगेटिव्ह रिटर्न्स दिले. यामध्ये तीन इक्विटी फंड्सने तर गुंतवणूकदारांचे पार दिवाळे काढले. तेव्हा केलेल्या गुंतवणुकीची समिक्षा जरूर करा. तज्ज्ञाचा सल्ला घ्या. सावध राहा, सावज होऊ नका.
Quant PSU Fund ने गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फटका दिला. या फंडने -20.28% निगेटिव्ह रिटर्न दिला. 1,20,000 रुपयांची गुंतवणूक 90,763 रूपयांवर आली. Quant ELSS Tax Saver Fund ने गुंतवणूकदारांना या वर्षात -11.88% XIRR रिटर्न दिला. Aditya Birla SL PSU Equity Fund ने गुंतवणूकदारांना -11.13% परतावा दिला. या फंडमध्ये पैसा वाढला नाही, कमी झाला.
इतर फंड्सने वाढवली चिंता
Quant Mutual Fund मधील इतर फंड्सने गुंतवणूकदारांची अशी चिंता वाढवली.
Quant Consumption Fund: -9.66%
Quant Quantamental Fund: -9.61%
Quant Flexi Cap Fund: -8.36%
Quant BFSI Fund: -7.72%
Quant Active Fund: -7.43%
Quant Focused Fund: -6.39%
Quant Mid Cap Fund: -5.34%
Quant Large & Mid Cap Fund: -4.54%
सेक्टोरल फंडची कामगिरी अशी
UTI Transportation & Logistics Fund: -4.05%
Quant Large Cap Fund: -3.74%
Quant Momentum Fund: -3.35%
SBI Equity Minimum Variance Fund: -3.06%
HDFC MNC Fund: -1.51%
Taurus Mid Cap Fund: -1.45%
PSU फंड्सने केले निराश
ICICI Pru PSU Equity Fund: -0.86%
SBI PSU Fund: -0.67%
Quant Business Cycle Fund: -0.66%
Baroda BNP Paribas Value Fund: -0.62%
अर्थात तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर या आकडेवारीने तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. बाजारातील चढ-उताराचे परिणाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर दिसून येतात. SIP गुंतवणूक ही नेहमी वेळेनुसार चांगला परतावा देते. अर्थात तुमचा अभ्यास, म्युच्युअल फंडची कामगिरी आणि तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा ठरतो.