Mutual Fund | गुंतवणूकदारांनी पॅटर्न बदलला; मोठ्या नाही तर छोट्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक
WITT Mutual Fund | म्युच्युअल फंडांना सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या भाषणात याविषयीच्या आकडेवारीच विस्तृतपणे मांडली. पण एक गोष्ट समोर येत आहे, ती म्हणजे दिग्गज कंपन्यांऐवजी गुंतवणूकदारांच्या स्मॉल कॅप फंडावर उड्या पडल्या आहेत. त्यामागची कारणं काय आहेत?
नवी दिल्ली | 27 February 2024 : सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण म्युच्युअल फंडावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्युच्युअल फंडातील या गुंतवणुकीचे आकडेच सर्वांसमोर मांडले. गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा आकडा गगना पार गेला आहे. शेअर बाजारापेक्षा थोडी सुरक्षितता आणि पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा अधिकचा परतावा हे त्यामागचं खरं कारण आहे.
इतक्या पट वाढली गुंतवणूक
2014 मध्ये देशात लोकांनी 9 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये ठेवले होते. आज 2204 मध्ये 52 लाख कोटींहून अधिक रुपये म्युच्युअल फंडात गुंतवल्याचे त्यांनी आकडेवारीसह सांगितले. पण गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्ये एक बदल लक्षणीरित्या समोर येत आहे, तो म्हणजे गुंतवणूकदारांच्या स्मॉल कॅप फंडावर उड्या पडल्या आहेत. त्यांनी दिग्गज कंपन्यांना चार हात दूर ठेवले आहे, यामागची कारणं तरी काय आहेत?
हे आहे कारण
- व्हॅल्यू रिसर्चचे CEO धीरेंद्र कुमार यांच्यानुसार, स्मॉलकॅप स्टॉक हे लार्जकॅप स्टॉकपेक्षा अधिक क्रियाशील, व्होलेटाईल असतात. मिड कॅप-स्मॉल कॅप फंड्सने 2023 मध्ये 40-45 टक्के रिटर्न दिला होता. या जोरदार कामगिरीमुळे ज्या गतीने गुंतवणूक वाढली आहे, ती चितांजनक आहे.
- बाजार नियंत्रक SEBI ने पण सर्वसामान्य गुंतवणूकदार स्मॉलकॅप शेअर्स आणि फंड्समध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणूक करत असल्याने, चिंता व्यक्त केली आहे. पण जर व्होलेटिलीटी वाढली तर गुंतवणूकदार शेअर्स विक्रीचा धमाका लावतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
- Samco Mutual Fund च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 मध्ये स्मॉल कॅप योजनेतंर्गत असेट अंडर मॅनजेमेंट (AUM) रेकॉर्ड 2.48 लाख कोटी रुपयांवर पोहचली. जानेवारीमद्ये हा आकडा 2.99 लाख कोटी रुपयांवर पोहचला. तर लार्ज-कॅप योजनेत AUM च्या जवळपास 83% होता.
धोका ओळखाल की नाही?
- White Oak Capital Management चे CEO आशिष सौमय्या यांच्यानुसार, गेल्या दोन वर्षात स्मॉल कॅप फंडनी मोठा परतावा दिला आहे. पण सध्याच्या घडीला यातील अनेक स्टॉक्स महाग झाले आहेत. पण एका ठराविक मुदतीनंतर त्यांच्याकडून तसाच परतावा येत असल्याने त्याविषयी शंका व्यक्त होत आहे.
- सध्या 250 स्टॉक्स स्मॉलकॅपमध्ये आहेत. तर मिडकॅपमध्ये 150 स्टॉक्स आहेत. ही साईज मर्यादित आहे. जर गुंतवणूकदारांकडून जास्त गुंतवणूक होत असेल तर ही गुंतवणूक फंड हाऊस या ठराविक स्टॉक्समध्येच गुंतवतील. आता हे स्टॉक्स बाजारात काय करतात यावर परताव्याचे गणित ठरेल.