नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : बँक ऑफ इंडियाने नारी शक्ती नावाने महिलांसाठी खास बचत खात्याचा श्रीगणेशा केला आहे. हे बचत खाते विशेष रुपाने 18 वर्ष आणि त्यावरील अधिक वयाच्या महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यांच्यासाठी ही खास सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक अपघात संरक्षण, स्वस्त आरोग्य विमा, लॉकर सुविदा, फ्री क्रेडिट कार्ड, कर्जावरील प्रक्रिया शुल्कात सवलत आदींचा समावेश करण्यात आला आहे. अजून काय काय आहेत या खात्याचा फायदा, जाणून घ्या…
नारी शक्ती बचत खात्याचा फायदा
हा तर जम्बो पॅक
नारी शक्ती बचत खाते केवळ एक नियमीत बचत खाते नाही. हे एक फायनेन्शिअल टूल आहे. त्यामुळे नोकरदार महिलांना, व्यावसायिक महिलांना त्याचा मोठा फायदा होईल. अतिरिक्त कमाईतून अधिक उत्पन्न मिळवता येईल. अनेक सोयी-सुविधा मिळतील. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल.
असे उघडा खाते
डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या हे खाते उघडता येईल. त्यासाठी काही कागदपत्रांची मात्र पूर्तता करावी लागणार आहे. तुम्हाला नारी शक्ती बचत खाते उघडायचे असेल तर बँक ऑफ इंडियाच्या 5132 च्या शाखा देशभर पसरल्या आहेत, या शाखेत तुम्हाला बचत खाते उघडता येईल.